You are currently viewing “रविवारी भरणार आजी आजोबांची शाळा”

“रविवारी भरणार आजी आजोबांची शाळा”

रविवारी भरणार आजी आजोबांची शाळा”

परीक्षा देणारी संख्या 2000 पार

सिंधुदुर्गनगरी

केंद्रपुरस्कृत ‘उल्लास – नव भारत साक्षरता कार्यक्रम’ अंतर्गत वय वर्ष 15 व त्यावरील असाक्षरांची पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी परीक्षा रविवार, दि. 29 मार्च 2026 रोजी सकाळी 10 ते सायं.5 वाजेर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात आयोजन करण्यात आल्याची माहिती शिक्षणाधिकारी (योजना), फारुखी अहमदी हाजी अफसरोद्दीन यांनी दिली आहे.

जिल्ह्यातील उल्लास अॅपवर नाव नोंदणी केलेली शाळा ही परीक्षा केंद्रावरती असाक्षर तरुण पिढीपासून आजी आजोबापर्यंत सर्वांची शाळा भरणार आहे. ही शाळा जणू लहानपणाची आठवण करुन देणारे बालपण, या शाळेत चाचणी परीक्षेस बसणाऱ्या सर्वांच्या चेहऱ्यावर आनंदाची प्रतिमा जागृत होत आहे. त्या त्या वेळच्या परिस्थितीनुसार शिक्षण घेता आले नसल्याने ही परीक्षा नव्याने साध्य करावी लागत असल्याचा आनंद गगनात मावेना अशी प्रतिमा परीक्षार्थीच्या तोंडी येत असून शाळेत जाण्याची चाहूल लागली आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा साक्षर जिल्हा म्हणून राज्यात प्रथम सन 2011-12 मध्ये आला होता, त्यावेळी साक्षर जिल्हा म्हणून नावाजलेला जिल्हा पुन्हा एकदा गाजला पाहिजे यामध्ये आमचा सिंहाचा वाटा आहे असे शब्द नवसाक्षरांच्या तोंडी पड़त आहे. याचाच गौरव म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हाची पावलवाट आहे. आतापर्यंत सिंधुदुर्ग जिल्हयातील असाक्षरांनी तीन चाचणी परीक्षा द्वार 9 हजार 901 साक्षर होण्याचा बहुमान मिळविला आहे.

रविवार दिनांक 29 मार्च रोजी होणाऱ्या 2000 पार करणाऱ्या परीक्षाधीना शुभेच्छा जिल्हा परिषद अध्यक्ष, प्रमोद कामत, शिक्षण सभापती नितेश राउळ यांनी दिलेल्या आहेत. मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी सिंधुदुर्ग जिल्हा लवकरच साक्षर जिल्हा म्हणून घोषित होईल अशी आशा व्यक्त केली आहे. जिल्हाधिकारी यांनी नवसाक्षरांचे तोंडभरुन कौतुक करताना म्हटल्या आहेत की, अशी पुन्हा शाळा भरावी लागणार नाही, आताची पिढी डिजीटल असून शिक्षणामध्ये सिंधुदुर्ग जिल्हयाचा एक पाऊल पुढे पडत असल्याचा अभिमान आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा