You are currently viewing हुमरस येथे माजी आम. वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना साहित्य व अल्पोपहार वाटप

हुमरस येथे माजी आम. वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना साहित्य व अल्पोपहार वाटप

शिवसेना शाखेचा सामाजिक उपक्रम; पंचायत समिती सदस्य योगेश धुरी यांचा सत्कार

कुडाळ :

माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त हुमरस शिवसेना शाखेच्या वतीने सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. गावातील दोन शाळा आणि तीन अंगणवाड्यांमधील मुलांना वॉटर बॉटल व अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले.

यावेळी माणगाव पंचायत समिती सदस्य योगेश धुरी यांचा जेष्ठ शिवसैनिक बाबू परब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमास शिवसेना शाखाप्रमुख संतोष परब, माजी सरपंच अनुप नाईक, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सौ. शलाका कवटकर, सिद्धेश नाईक, ज्ञानेश्वर सावंत तसेच युवासेना उपशाखाप्रमुख महेश वारंग, जेष्ठ शिवसैनिक सुरेश कुडकर, विकास कुडकर, मायन स्वामी, प्रकाश आरोनदेकर, श्यामाप्रसाद कामत, विनायक नाईक, मोहन देउलकर, सतीश कवटकर, महेश कुडकर, मयूर गुडेकर, गौरव तामाणेकर आणि इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा