You are currently viewing दिव्यांग बांधवांचा विभागवार मेळावा संपन्न

दिव्यांग बांधवांचा विभागवार मेळावा संपन्न

दिव्यांग बांधवांचा विभागवार मेळावा संपन्न

सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशिय शिक्षण संस्था कसाल व महात्मा गांधी सेवा संघ संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्ग व तुळस ग्रामपंचायतीच्या वतीने शुक्रवार दिनांक 27/03/2026रोजी तुळस पंचक्रोशीतील सर्व दिव्यांग बांधवांचा विभागीय मेळावा सकाळी 10.00 वाजता संपन्न झाला. या मेळाव्यामध्ये श्री. शंकर शशिकांत घारे, वेंगुर्ला पंचायत समिती सभापती, सौ.सुजाता अजित पडवळ तुळस जिल्हा परिषद मतदार संघ जी.प.सदस्य,रश्मी रामचंद्र परब तुळस सरपंच श्री. सचिन सुरेश नाईक, तुळस उपसरपंच श्री नारायण कुंभार, ग्रामपंचायत सदस्य स्वाती सावंत ग्रामपंचायत सदस्य मातोंडसदस्य सावंत मॅडम, ग्रामपंचायत कर्मचारी समर्थ तुळसकर दीनानाथ साळगावकर सूर्यकात सावंत अवधुत तुळसकर, तुळस गावचे ग्रामसेवक सुनील चव्हाणतसेच संस्था अध्यक्ष अनिल शिंगाडे सर, संस्था कर्मचारी विशाखा कासले,प्रसन्ना शिर्के ललित गावडे आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या वतीने स्वागत सभारंभ करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.संस्था अध्यक्ष अनिल शिंगाडे सरांनी दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन केले. श्री.शंकर घारे सर वेंगुर्ला पंचायत समिती सभापती यांनी दिव्यांग बांधवांना अमूल्य मार्गदर्शन केले.व आपल्या जे काही अडचणी असतील ते त्या शंकेच अडचणींचे निवारण करून घ्या.व आपलं काम पूर्ण करून घ्या असे आवाहन केले.
त्याचबरोबर रश्मी परब मॅडम यांनी देखील दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन केले तसेच साईकृपा संस्थेच्या वतीने दोन अंध दिव्यांग बांधवांना अंध काठी देण्यात आली.या मेळाव्याला ४०हून जास्त दीव्यांग उपस्थित होते. सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसालच्या वतीने सर्व दिव्यांग बांधवांना भेटवस्तू देण्यात आल्या.संस्था कर्मचारी कासले मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा