You are currently viewing मालवणात ५ एप्रिल रोजी हिंदू संमेलन

मालवणात ५ एप्रिल रोजी हिंदू संमेलन

मालवणात ५ एप्रिल रोजी हिंदू संमेलन

मालवण :

मालवण दशक्राेशी मधील हिंदू समाजामध्ये स्वत्वाची जाणीव होऊन हिंदू समाजामध्ये ऐक्याची भावना कायम रहावी यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने रविवार दि. ५ एप्रिल रोजी आर.जी.चव्हाण मंगल कार्यालय, वायरी या ठिकाणी सायंकाळी ठीक ४ वाजता हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

सदर कार्यक्रमांमध्ये प्रमुख व्याख्यात्यांच्या स्फूर्तीदायक व्याख्यानाबरोबरच मालवण मधील तरुण कलासंपन्न व्यक्तींच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या संमेलनाला विराट स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी आणि हिंदू समाजामध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी या संमेलनाला मालवण दशक्राेशीमधील हिंदू नागरिकांनी आपल्या कुटुंब आणि मित्रपरिवारासह मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन या सकल हिंदू संमेलन समितीचे संयोजक ॲड. पलाश लीलाधर चव्हाण, सहसंयोजक अविनाश काेळंबकर, साै. शिल्पा गाड, कोषाध्यक्ष विनायक न्हिवेकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा