You are currently viewing फोंडाघाटमध्ये रामनवमी उत्साहात साजरी; विविध धार्मिक कार्यक्रमांनी परिसर भक्तिमय

फोंडाघाटमध्ये रामनवमी उत्साहात साजरी; विविध धार्मिक कार्यक्रमांनी परिसर भक्तिमय

फोंडाघाटमध्ये रामनवमी उत्साहात साजरी; विविध धार्मिक कार्यक्रमांनी परिसर भक्तिमय

अजित नाडकर्णी यांची विविध मंदिरांना भेट; महाप्रसाद, भजन व स्पर्धांनी रंगली रामनवमी

फोंडाघाट

फोंडाघाट येथे आज श्री रामनवमी उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. पाच झाड पाचोबा येथे श्री. संजय आग्रे मित्र मंडळातर्फे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी १२ वाजता श्री राम जन्म सोहळा पार पडला. त्यानंतर सत्यनारायण पूजेसह दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
संध्याकाळी रील स्पर्धा तर रात्री भजन कार्यक्रमाने वातावरण अधिकच भक्तिमय झाले. या कार्यक्रमाला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
दरम्यान, सकाळी अजित नाडकर्णी यांनी संजय आग्रे यांची भेट घेत कार्यक्रमाची पाहणी केली.
त्याचप्रमाणे हवेली नगर येथील श्री साई मंदिरातही रामनवमी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. येथे दुपारी श्री साई भंडारा, तसेच जन्म सोहळा पार पडणार आहे. संध्याकाळी मंदिरापासून श्री राधाकृष्ण मंदिरापर्यंत साईंची पालखी काढण्यात येणार आहे.
या ठिकाणीही अजित नाडकर्णी यांनी सकाळी भेट देत आयोजकांशी संवाद साधला. रात्री भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून भाविक मोठ्या श्रद्धेने सहभागी होत आहेत.
संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून भाविक महाप्रसादाचा लाभ घेत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा