*कार्यकर्त्यांच्या बळावर लाचारी आणि दबाव झुगारण्याची ताकद मला मिळूदे, हेच माझे देवाकडे गाऱ्हाणे – वैभव नाईक*
*विविध सामाजिक उपक्रमांनी कुडाळात मा.आ. वैभव नाईक यांचा वाढदिवस उत्साहात साजरा*
*वैभव नाईक पुन्हा आमदार होणार-जीजी उपरकर*
कार्यकर्त्यांच्या प्रेमातून मला ऊर्जा मिळत असून आज माझा पराभव झाला असला, तरी याच उर्जेने मी पुढे काम करत राहणार आहे. सत्ता नसली तरी अनेक लोक आमच्यासोबत आहेत, हे जिल्हा परिषद निवडणुकीत स्पष्ट दिसून आले.आज निकाल वेगळा लागला असला, तरी लोकांचा विश्वास आणि पाठिंबा आपल्यासोबत आहे. निवडून आलेले आमदार,खासदार आज मतदारसंघात फिरताना दिसत नाहीत.जिल्ह्यातील प्रश्नांसाठी आम्ही संघर्ष करत आहोत,आम्ही मात्र पळ काढणारे नाही,आम्ही लोकांसाठी कायम उभे राहणारे आहोत.आज राजकारणात आमच्यातील काही लोक सत्तेत गेले आहेत, पण त्यांच्या जाण्याने तुम्ही गोंधळून जाऊ नका. उद्या रामनवमी आहे. मी अयोध्येला जाणार नाही, पण माझ्या मतदारसंघात रामनवमी साजरी करणार आहे.माझे देवाकडे एकच गाऱ्हाणे आहे की, कार्यकर्त्यांच्या बळावर लाचारी आणि दबाव झुगारण्याची ताकद मला मिळूदे, आणि लोकसेवा करण्याची ताकद देऊदे! चला,आपण पुन्हा एकदा शिवसेना उभी करूया असा विश्वास कार्यकर्त्यांना वैभव नाईक यांनी दिला.
कुडाळ मालवण मतदारसंघाचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आज कुडाळ येथील महालक्ष्मी हॉलमध्ये रक्तदान शिबीर घेण्यात आले. तसेच कुडाळ शहरातील शिवसेना रिक्षा युनियन चालकांचा २ लाखांचा विमा उतरविण्यात आला. दशावतारी कलाकार व रक्तदात्यांना भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. कुडाळ तालुक्यातील सातेरी दशावतार महिला नाट्य मंडळाच्या कलाकारांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर कुडाळ तालुका शिवसेनेच्या वतीने वैभव नाईक यांना पुष्पहार घालून, सुहासिनींनी औक्षण करून, केक कापून वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पदाधिकारी व शिवसैनिकांनी वैभव नाईक याना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.वाढदिवस अभिष्टचिंतन कार्यक्रमाला तालुक्यातूनन पदाधिकारी-कार्यकर्ते व हितचिंतक यांची उस्फुर्त उपस्थिती होती.
माजी आमदार जीजी उपरकर म्हणाले, आज वैभव नाईक माजी आमदार असले, तरी ते पुन्हा आमदार होणार आणि भविष्यात राज्याचे नेतृत्व करणार, याबद्दल मला पूर्ण विश्वास आहे. आज सत्ताधारी आमदार आणि पालकमंत्री सभागृहात ‘आपण मार खाल्ला’ असे सांगत आहेत, यावरून सध्याची परिस्थिती काय आहे, हे स्पष्ट दिसते. पुढचा काळ जरी कठीण असला, तरी तो शिवसेनेसाठी निश्चितच चांगला ठरणार आहे.निवडणुकीदरम्यान ३०० कोटींचे ट्रेनिंग सेंटर उभारणार असल्याचे आश्वासन देण्यात आले होते, त्याचे काय झाले?असा त्यांनी सवाल उपस्थित केला. चार प्रामाणिक कार्यकर्ते असले, तरी ते खूप महत्त्वाचे असतात. त्यामुळे पुढील निवडणुकीत वैभव नाईक यांना पुन्हा निवडून आणण्यासाठी आपण सर्वांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करूया, असेही त्यांनी आवाहन केले.
उपनेत्या जान्हवी सावंत म्हणाल्या, येणारा काळ आपलाच आहे. वैभव नाईक यांच्या विजयासाठी सर्वांनी प्रामाणिकपणे काम करूया आणि त्यांना पुन्हा आमदार बनवूया.असे आवाहन केले.अमरसेन सावंत म्हणाले की, आज वैभव नाईक यांच्यासोबत निष्ठेने काम करणारे कार्यकर्ते उरले आहेत. जे स्वार्थी होते, ते निघून गेले आहेत.पण एक दिवस पुन्हा आपला येईल, त्यासाठी आपण आत्तापासून प्रयत्नात राहुया असे मत व्यक्त केले.
यावेळी अमरसेन सावंत आणि राजन नाईक यांनी वैभव नाईक यांच्या कार्याचा गौरव करत ते पुन्हा आमदार होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.अतुल बंगे म्हणाले, वैभव नाईक नाराज नाहीत, पण आम्ही कार्यकर्ते मात्र नाराज आहोत. याच वैभव नाईक यांनी दशावतार कलेची दखल घेत कलाकारांना मदत केली. सध्याच्या आमदारांना कुटुंब एक कोटींची गाडी देऊ शकते, पण आमचे आमदार अपंगांची आठवण काढून गाङ्या देण्यासाठी प्रयत्न करायचे, हा आताचे व आमचे आमदार यांच्यात फरक आहे.कृष्णा धुरी म्हणाले,निष्ठावंत आमदार म्हणून तुमची राज्यात ओळख आहे. भविष्यात तुम्ही महाराष्ट्राचे नेतृत्व कराल, अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट,स्नेहा नाईक, नंदिनी नाईक, राजवर्धन नाईक, जि. प.सदस्य गंगाराम सडवेलकर,जि. प.सदस्य रूपेश पावसकर, कुडाळ तालुकाप्रमुख कृष्णा धुरी, तालुकाप्रमुख राजन नाईक,तालुका संघटक सचिन कदम, बबन बोभाटे, अतुल बंगे, अनुप नाईक, अवधूत मालंडकर, संतोष शिरसाट, संदीप महाडेश्वर, अमित राणे, गुरु गडकर,अशपाक कुडाळकर, दीपक आंगणे, बंड्या कोरगावकर, ऍड. सुधीर राऊळ, गोट्या चव्हाण, बाबी गुरव, दिपेश परब,अरुण परब आदी उपस्थित होते.
