You are currently viewing कुडाळ येथे २७ व २८ मार्च रोजी ग्रंथोत्सव २०२५ चे आयोजन

कुडाळ येथे २७ व २८ मार्च रोजी ग्रंथोत्सव २०२५ चे आयोजन

कुडाळ येथे २७ व २८ मार्च रोजी ग्रंथोत्सव २०२५ चे आयोजन

सिंधुदुर्गनगरी

ग्रंथालय संचालनालयमहाराष्ट्र राज्यमुंबईजिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयसिंधुदुर्ग तथा सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघ यांच्या संयुक्त विद्यमाने कुडाळ येथील गुलमोहर हॉटेलच्या महालक्ष्मी सभागृहात शुक्रवार दिनांक 27 मार्च व शनिवार दिनांक 28 मार्च 2026 रोजी ग्रंथोत्सव 2025 चे आयोजन करण्यात आले आहे.

या ग्रंथोत्सवाचे उद्घाटन 27 मार्च 2026 रोजी मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.

शुक्रवार दि. 27 मार्च 2026 रोजी विद्यार्थ्यांचा दशावतार कार्यक्रम तसेच कै. गंगाराम गवाणकर यांच्या साहित्यावर अभिवाचन व चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.

शनिवार दि. 28 मार्च 2026 रोजी प्रसाद कुलकर्णी यांचा आनंद यात्रा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर वाचन संस्कृती वाढविण्यासाठी ग्रंथपालाची भूमिका हा परिसंवाद होणार आहे .तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शतायु ग्रंथालय सन्मान सोहळा हा कार्यक्रम दुपारी 3 वाजता होणार आहे. या ग्रंथोत्सवामध्ये विविध ग्रंथ विक्रीचे स्टॉलही उपलब्ध असणार आहेत.

तरी नागरिकांनी व पुस्तकप्रेमींनी या ग्रंथोत्सवाचा लाभ घ्यावाअसे आवाहन ग्रंथोत्सव समिती 2025 यांनी केले आहे. तसेच या ग्रंथोत्सवास उपस्थित राहण्याचे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे यांनी केले आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा