You are currently viewing जिल्हा परिषद विषय समिती सभापतीपदासाठी शिवसेनेची घोषणा; साटविलकर व तांबे यांना संधी

जिल्हा परिषद विषय समिती सभापतीपदासाठी शिवसेनेची घोषणा; साटविलकर व तांबे यांना संधी

जिल्हा परिषद विषय समिती सभापतीपदासाठी शिवसेनेची घोषणा; साटविलकर व तांबे यांना संधी

सिंधुदुर्गनगरी

जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापती पदासाठी शिंदे शिवसेनेने आपल्या उमेदवारांची अधिकृत घोषणा केली आहे. जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे उपनेते संजय आंग्रे यांनी ओरोस येथे ही घोषणा केली.
यामध्ये मालवण तालुक्यातील पेंडूर जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडून आलेले संतोष साटविलकर यांची वित्त व बांधकाम सभापती पदासाठी निवड करण्यात आली आहे. तसेच कणकवली तालुक्यातील जाणवली मतदारसंघातून निवडून आलेल्या रुहिता तांबे यांची समाजकल्याण सभापती पदासाठी उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे.
या निवडी जाहीर करताना जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजय पडते, उपाध्यक्ष तुकाराम उर्फ दादा साईल, गटनेते केशव नारकर यांच्यासह शिवसेनेचे इतर जिल्हा परिषद सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्ह्यातील विकासकामांना गती देणे आणि समाजकल्याण तसेच बांधकाम विभागाच्या योजना प्रभावीपणे राबवणे या उद्देशाने अनुभवी लोकप्रतिनिधींना संधी देण्यात आल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले.
या निवडीमुळे मालवण व कणकवली तालुक्यातील शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, लवकरच या पदांचा अधिकृत पदभार स्वीकारण्याची प्रक्रिया पार पडणार आहे. जिल्हा परिषद प्रशासनावर पकड अधिक मजबूत करण्यासाठी अनुभवी आणि नव्या चेहऱ्यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न शिवसेनेने केल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा