गोव्याचे उपमुख्यमंत्री ॲड. रमाकांत खलप यांच्या हस्ते आले गौरविण्यात
कणकवली
गोवा येथिल गोवा हिंदी अकादमी द्वारे राष्ट्रभाषा हिंदी प्रचार आणि संवर्धनाच्या राष्ट्रीय कार्यातील प्रशंसनीय योगदानासाठी सिधुदुर्ग जिल्हातील चार शिक्षकांना आदर्श हिंदी प्रचारक भाषारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गोवा मीरामार येथिल सोलमार सभागृहात आयोजित केलेल्या गोवा हिंदी अकादमी पुरस्कृत महाराष्ट्र राज्याच्या राज्यस्तरीय हिंदी प्रचारक संमेलन २० फेब्रुवारी रोजी संपन्न झाले. गोवा राज्याचे उपमुख्यमंत्री ऍड. रमाकांत खलप यांच्या हस्ते कणकवली तालुक्यातील कळसुली इंग्लिश स्कुल, कळसुलीचे शिक्षक अमर पांडुरंग पवार याना ” आदर्श हिंदी प्रचारक भाषारत्न ” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. देवगड तालुक्यातील शा. वि. कुलकर्णी माध्यमिक विद्यालय, मोंडच्या सौ. आसावरी सुनिल कदम, सावंतवाडी तालुक्यातील श्री जनता विद्यालय, तळवडेचे अंकुश धवळू चौरे व विद्याविहार इंग्लिश स्कुल, अजगावचे उत्तम भगवंता भागीत यांनाही आदर्श हिंदी प्रचारक ‘भाषारत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी दै. नित्य समयचे संपादक प्रभाकर ढगे, गोवा औद्योगिक महामंडळाचे माजी व्यवस्थापक विजयकुमार शेट, बिजू उद्योग समूह गुजरातचे बिजू भाई, गोवा हिंदी अकादमीचे अध्यक्ष सुनिल शेट, संमेलन संयोजक कैलास जाधव इत्यादी मान्यवर उपस्थित होते.