*आमदार दिपक केसरकर यांनी आमदरकीचा राजीनामा द्यावा.- वेंगुर्ला तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष प्रथमेश परब.*
वेंगुर्ला
सिंधुदुर्ग जिल्हा सुशिक्षित आणि सुसंस्कृत जिल्हा आहे आणि विशेष करून वेंगुर्ला, सावंतवाडी,दोडामार्ग हे तालुके सुशिक्षित, सुसंस्कृत व विज्ञाननिष्ठ समजले जातात आणि या भागाचे प्रतिनिधीत्व करणारे आमदार दिपक केसरकर यांचे संबंध लिंगपिसाट भोंदू बाबा अशोक खरात याच्या सोबत असल्याचे प्रसार माध्यमातून समोर आले आहे. अशोक खरात याच्या पेनड्रायुव्ह मध्ये 58 व्हिडीओ असल्याचे समोर आले आहे. सध्या अशोक खरात याला अटक करण्यात आली आहे. श्रद्धेच्या नावाखाली अंधश्रद्धा पसरवून अशोक खरात यांने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केले आहे. अशा लिंगपिसाट भोंदू बाबा बरोबर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिपक केसरकर यांचे संबंध असणे हे मतदारसंघाला आणि जिल्ह्याला लांच्छनास्पद आहे. अशा कलंकित आमदार दिपक केसरकर यांनी आपल्या आमदारकीचा ताबडतोब राजीनामा द्यावा अशी मागणी वेंगुर्ला तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रथमेश ऊर्फ बड्या परब यांनी केले आहे.
