You are currently viewing अन्याय निवारण फोर्स सिंधुदुर्ग या संघटनेची स्थापना

अन्याय निवारण फोर्स सिंधुदुर्ग या संघटनेची स्थापना

अध्यक्षपदी साईप्रसाद कल्याणकर, तर उपाध्यक्षपदी चंद्रशेखर जोशी यांची निवड

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन अन्याय निवारण फोर्स सिंधुदुर्ग या संघटनेची स्थापना केली. सिंधुदुर्ग जिल्हा भ्रष्टाचार मुक्त करणे हे या संघटनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. संघटनेचे अध्यक्षपदी साईप्रसाद मंगेश कल्याणकर – बांदा, उपाध्यक्ष – चंद्रशेखर शिवराज जोशी, माणगाव, सचिव – यशवंत कृष्णा आमोणेकर, विलवडे, सहसचिव – शेखर सुरेश नाईक सावंतवाडी, खजिनदार – सूर्यकांत विठ्ठल नाईक आरोंदा, श्रेयस साईनाथ मुंज सावंतवाडी, शिवाजी गोविंद गवस झोळंबे यांची विश्वस्त म्हणून एकमताने निवड करण्यात आली.

अन्याय निवारण फोर्स सिंधुदुर्ग ही संघटना विविध कार्यालयातील भ्रष्टाचार व अन्यायाला वाचा फोडण्यासाठी काम करणार आहे. या संघटनेतर्फे माहिती अधिकार कार्यकर्ते विविध क्षेत्रात निरपेक्ष, निस्वार्थ, भावनेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभी राहणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बेकायदा गौण खनिज उत्खनन आणि वाहतूक रॉयल्टी चोरीस प्रतिबंध करण्याचा पाठपुरावा करणे, प. म. देवस्थानच्या जमिनीतील व्यावसायिक इमारतींची अतिक्रमण हटविण्यासाठी पाठपुरावा करणे हे सुद्धा या संघटनेचे मुख्य मिशन आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा