*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*थोरवी..*
थोरवी आहे द्रष्ट्या संतांची
माणुसकीने जगणे शिकवले
इतरांची संवेदना जाणून
दु:खितांचे अश्रू पुसले…!!
थोरवी किती आईची
जन्म देऊन जगात आणते
मायेचा ठेवा अविरत
आशीर्वादाचा शिरी हात देते…!!
काय वर्णावी थोरवी
गुरूजनांनी शिक्षित केले
कठोर कधी मृदु होऊन
संस्कारांचे बीज पेरले….!!
हा महाराष्ट्र आमुचा
गाऊ थोरवी त्याची
अभिमान आहे आम्हाला
शिवबांचे गडकिल्ले माची…!!
सरस्वतीची गाते थोरवी
लय ताल शब्द स्वर
तिच्या कृपेने अक्षर लेणे
काळजातून येतो बहर…!!
०००००००००००००००००
अरुणा दुद्दलवार @✍️🙏🏻✍️🌹
