प्रमाणपत्र वितरण व नवीन तुकड्यांचा शुभारंभ सोहळा २० मार्च रोजी
किमान कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत उपक्रम
सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२४-२५ अंतर्गत किमान कौशल्य विकास कार्यक्रमातील प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण तसेच सन २०२५-२६ मधील नवीन तुकड्यांच्या प्रशिक्षणाचा शुभारंभ सोहळा शुक्रवार, दि. २० मार्च २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता आयोजित करण्यात आला आहे.
विविध मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी मा. श्रीमती तृप्ती धोडमिसे (भा.प्र.से.) यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी अटल प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष मा. अॅड. श्री. नकुल पार्सेकर, बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन मा. श्री. उमेश गाळवणकर, एस. पी. के. कॉलेजचे प्राचार्य मा. श्री. दिलीप लक्ष्मण भारमल तसेच माजी सहाय्यक आयुक्त मा. श्रीमती इनुजा शेख उपस्थित राहणार आहेत.
प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती
प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सौ. गौरी रघुनाथ तानावडे, कुडाळ एम.आय.डी.सी. इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष मा. श्री. मोहन होडावडेकर, सहाय्यक आयुक्त मा. श्री. भैय्याजी येरमे, इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. भुपतसेन सावंत आणि स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे प्राचार्य मा. श्री. प्रा. कैलास राबते उपस्थित राहणार आहेत.
कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान
या सोहळ्यात विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मानित करण्यात येणार आहे. कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
स्थळ
हा कार्यक्रम एस. एस. आय. कॉम्प्युटर, सावंतवाडी येथे पार पडणार आहे.
