*’निसर्गाचा खजिना’ बालकुमारांच्या मनाला भावणारा! – राजन लाखे*
*रश्मी गुजराथी लिखित ‘निसर्गाचा खजिना’ कथासंग्रहाचे प्रकाशन संपन्न*
पिंपरी
”निसर्गाचा खजिना’ बालकुमारांच्या मनाला भावणारा आणि त्यांचे भावविश्व समृद्ध करणारा आहे!’ असे गौरवोद्गार महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी – चिंचवड शाखाध्यक्ष राजन लाखे यांनी एस एम जोशी सभागृह, नवी पेठ, पुणे येथे मंगळवार, दिनांक १७ मार्च २०२६ रोजी काढले. ज्येष्ठ बालसाहित्यिका रश्मी गुजराथी लिखित आणि यशोदीप पब्लिकेशन्स निर्मित ‘निसर्गाचा खजिना’ या बालकुमार कथासंग्रहाचे प्रकाशन करताना राजन लाखे बोलत होते. ज्येष्ठ बालसाहित्यिका प्रा. डॉ. नीलिमा गुंडी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या; तसेच ज्येष्ठ बालसाहित्यिक डाॅ. दिलीप गरुड, बाळकृष्ण बाचल, शिवाजी चाळक, प्रकाशिका प्रा. रूपाली अवचरे, निखिल लंभाते यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
आस्मानी गुजराथीची गणेशवंदना, दीपप्रज्वलन आणि प्रतिमापूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. आंब्यांच्या पानांचे आवरण असलेल्या ‘निसर्गाचा खजिना’ या कथासंग्रहाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी बाळकृष्ण बाचल यांनी, ‘ज्ञान आणि मनोरंजन यांचा सुंदर समन्वय असलेला ‘निसर्गाचा खजिना’ वाचून बालसाहित्यिक घडतील!’ असा विश्वास व्यक्त केला. डॉ. दिलीप गरुड यांनी संग्रहातील ‘सूर्यफूल’ या कथेचे अभिवाचन केले. रूपाली अवचरे यांनी, ‘आजतागायत प्रकाशित झालेल्या सुमारे पस्तीस पुस्तकांच्या माध्यमातून रश्मी गुजराथी यांच्या लेखनातील सामाजिक बांधिलकीची जाणीव प्रतीत होते!’ असे मत व्यक्त केले. रोहित गुजराथी आणि रुचिता जोशी यांनी आपल्या मनोगतातून आई आणि कथालेखिका अशा दुहेरी नात्यांचे हृद्य अनुबंध उलगडून दाखविले; तर स्नेही परिवाराच्या वतीने संगीता ववले यांनी प्रातिनिधिक स्नेह भावना व्यक्त केली.
लेखिका रश्मी गुजराथी यांनी आपल्या मनोगतातून, ‘निसर्गाचे विविध विभ्रम आपल्याला आवडतात. तो समृद्ध निसर्ग कथांच्या माध्यमातून अक्षरबद्ध केल्याने बालवयातच मुलांवर पर्यावरण रक्षणाचे संस्कार रुजतील!’ असा विश्वास व्यक्त केला. डॉ. नीलिमा गुंडी यांनी अध्यक्षीय मनोगतातून, “निसर्गाचा खजिना’चे मुखपृष्ठ, आतील चित्रे आणि तपशील बालमनाचे कुतूहल जागृत करणारा आहे. कथांमधील शब्दांची तरलता दृकसाक्षरता वर्धित करणारी अन् निसर्गाला बोलका करणारी आहे!’ असे मत मांडले.
रवींद्र गुजराथी, अर्णव जोशी यांनी संयोजन केले. सीमा गांधी यांनी सूत्रसंचालन केले. गायत्री गुजराथी यांनी आभार मानले.
– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२
_________________________
*संवाद मीडिया*
💐*प्रवेश ! प्रवेश !! प्रवेश !!!*💐
(शैक्षणिक वर्ष *20226-27* करिता )
========================
https://sanwadmedia.com/198487/
🌹 *यश सिद्धी कोचिंग क्लासेस सायन्स अँड कॉमर्स अकॅडमी* 🌹
*MHT- CET 2026* *क्रॅश कोर्स*
12 वी science च्या विद्यार्थ्यांसाठी.
Sub..*PCM / PCB*
*26 फेब्रुवारी पासून.* बॅच सुरू.
========================
*12वी science* Regular batch
subject
*Physics, Chemistry*
*Maths, Biology*
*2 एप्रिल पासून.* बॅच सुरू.
Batch timing..
*सकाळी 8.30 ते 11.30* ( अभ्यंकर कुलकर्णी ज्यू. कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी)
*दुपारी 1.30 ते 4.30* ( शिर्के, पटवर्धन, फाटक आणि नवनिर्माण कॉलेज च्या विद्यार्थांसाठी )
========================
*12वी commerce* Regular batch
Subject
*Account, Maths English*
*2 एप्रिल पासून* बॅच सुरू.
Btach timing
*सकाळी 9 वाजता* ( अभ्यंकर कुलकर्णी ज्यू कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी)
*दुपारी 1.30 वाजता* ( शिर्के, पटवर्धन आणि फाटक कॉलेज च्या विद्यार्थ्यांसाठी )
========================
*10वी ( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )*
Subject
*Maths, science*
*English, Sanskrit*
*6 एप्रिल पासून* बॅच सुरू.
========================
🌹 *यश सिद्धी कोचिंग क्लासेस सायन्स अँड कॉमर्स अकॅडमी* 🌹
शिर्के प्लाझा, कलेक्टर ऑफिस समोर, जयस्तंभ, रत्नागिरी.
संपर्क.. *श्री तेंडुलकर सर.*
9421141980
8208702704
*ऑफिस*
9422896719.
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/198487/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*
