*ज्येष्ठ लेखिका कवयित्री कला शिक्षिका स्वप्नगंधा सतीश आंबेतकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*मोबाईल*
मोबाईल ने बाजी मारली
तन्त्रज्ञानाने तर कमाल केली
पोटातली खरी भूक मेली
मोबाईल पहाताना ढेरी सुटली.
मग त्याच मोबाईल वर येती
डाएट साठी हजार प्लॅन
पैसे भरुन पोट कमी करा
फक्त एवढेच करा वाटेल छान.
मोबाईल पाठी किती घालवा वेळ
पैसा आणि वेळेला किंमत शून्य
खर्या नात्यांना विचारते तरी कोण
घरातल्या परीस बाहेरचे मान्य.
फक्त एकच राहिलाय मोबाईल बाळाबरोबर जन्मा येत नाय
त्याचे जन्मत: च रडणे कायमचे
मोबाईलच्या रीलमध्ये घुसून जाय.
ज्याच्या त्याच्या हाती चपटी डबी
सार्या जगाची त्यात दडलीय खुबी
कोणाचे कोणावाचून अडत नाय
आबालवृद्धान्ची दिसेआनंदी छबी.
नसता हाती मोबाईल तर मी पण
नसते लिहिले डोक्यात भरलेय उगा
विचारांचे सर्पण मनावर येई दडपण
ताबासर्वांच्या मेंदूचा पार झालायभुगा
कळत नकळत आपण कशाच्याही
आहारी पडतो,कळते पण वळतनाही
झटक्यात होतात कामे सारी पटकन
हवेनको ते मिळते,सवय सुटत नाही
माणूस किती पटकन जातो आहारी
गरजेपेक्षा अधिक हाव वाढते खरी
पैशाची आवक किती झाली तरी
मोबाईल ने धरली त्याची नस खरी.
स्वप्नगन्धा सतीश आम्बेतकर
