डहाणू:
जागतिक महिला दिन हा, महिलांचा आदर, सन्मान, त्यांच्या कार्याचा गुणगौरव सोहळा असतो. म्हणूनच या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी, डहाणू नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मा. श्री. अक्षय गुडधे साहेब उपस्थित होते,तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ साहित्यिका मा.सौ.अनुपमा जाधव, तसेच वैद्यकीय अधिकारी मा.डाॅ. सौ. मृगनयना जाधव, बालकल्याण सभापती मा.सौ.युगाली संदेश पाटील,व नगरसेविका यांच्या हस्ते सर्व प्रथम प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.
त्यांनंतर मुख्याधिकारी मा.अक्षय गुडधे , प्रमुख अतिथी मा.सौ.अनुपमा जाधव व मा.सौ.डाॅ.मृगनयना यांचा सौ.युगाली संदेश पाटील यांनी शाल श्रीफळ ,व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
मा.अक्षय गुडधे साहेब यांनी सर्व महिला भगिनींना जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा दिल्या. व या उपक्रमाबद्दल आनंद व्यक्त केला.
डाॅ.सौ.मृगनयना जाधव यांनी महिलांना आरोग्यासंबधी मार्गदर्शन केले. आरोग्य विभागातर्फे महिलांना देण्यात येणाऱ्या सेवा , तसेच योग्य आहार,निद्रा आणि व्यायाम या बद्दल योग्य समुपदेशन केले.प्राथमिक आरोग्य केंद्रात मिळणाऱ्या एन. सी.डी कार्यक्रमाबद्दल माहिती दिली.
ज्येष्ठ साहित्यिका सौ.अनुपमा जाधव यांनी महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी. तसेच वाचन,मनन करावे, आपल्यातील कला गुणांना वाव द्यावा,सतत आनंदी रहावे कष्टकरी,श्रमकरी यांच्या कार्याचे त्यांनी कौतुक केले. त्यांच्या श्रमाची बरोबरी कितीही मोबदला दिला तरी करता येणार नाही, त्यामुळे त्यांना देखील आदर सन्मान द्यावा. महिलांनी स्वतः विषयी न्यूनगंड न बाळगता आत्मनिर्भर व्हावे. शिक्षणाबरोबरच कराटे, पोहणे, आपली आवड व छंद जोपासायला हवा.स्वता: साठी देखील जगायला हवं, जिजामाता, ताराबाई, लक्ष्मीबाई, क्रांती ज्योती सावित्रीबाई, रमाई, तसेच पंतप्रधान इंदिरा गांधी, राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, व आताच्या मा. राष्ट्रपती द्रोपदी मूर्मू यांच्या कार्याची प्रेरणा आपण घेऊन उत्तुंग शिखर गाठावे. त्यांनी आपल्या महिलांना प्रेरणा देणाऱ्या काही कविता देखील सादर केल्या. स्त्री आदिशक्ती आहे.
ती रान तुडवते.
विमान उडवते
डोंगर चढते.
लढाई लढते
काय आहे तिच्यात कमी
कमी नाही काही
तिने कधीच कवेत घेतल्या
दिशा या दाही..!
या कवितेतून महिलांचा शब्द सुमनांनी गुणगौरव करुन
शुभेच्छा दिल्या. या उपक्रमामुळे महिला भगिनी मंत्रमुग्ध झाल्या. जणू आनंदाचे उधाण..!
सदर कार्यक्रमास नगरसेविका,सौ.भारती पाटील, शुभांगी पाटील, प्रतिक्षा सुरती, अश्विनी पटेल, मनिषा वावरे उपस्थित होत्या.
या कार्यक्रमात महिला सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमासाठी उपस्थित महिलांसाठी विविध खेळ, उपक्रम घेण्यात आले. विजेत्यांना बक्षीस देण्यात आले. तसेच सर्वांना छानसा अल्पोपहार देण्यात आला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महिला कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.
सुत्रसंचलन प्रतिक्षा अरबुने यांनी अतिशय सुंदर पद्धतीने केले.
श्री.वैभव हेगडे, श्री.संदेश पाटील यांचेही सहकार्य लाभले.
