You are currently viewing जागतिक महिला दिनानिमित्त सावंतवाडी ज्येष्ठ नागरिक संघात महिलांचा गौरव

जागतिक महिला दिनानिमित्त सावंतवाडी ज्येष्ठ नागरिक संघात महिलांचा गौरव

जागतिक महिला दिनानिमित्त सावंतवाडी ज्येष्ठ नागरिक संघात महिलांचा गौरव

विविध क्षेत्रातील महिलांचा शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन सत्कार; मेघना राऊळ यांचे सूत्रसंचालन

सावंतवाडी

सावंतवाडी येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संघाचे अध्यक्ष दिगंबर पावसकर यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला.
यानंतर अण्णा देसाई व प्रकाश राऊळ यांनी महिलांच्या कार्याचा गौरव करत मार्गदर्शन केले. कार्यक्रमात मीनल मारुती सावंत (उपाध्यक्ष, ऑनलाईन रक्तदाता संस्था), गौरी भिसे, सौ. सिद्धी पेडणेकर, डायना फ्रान्सिस डिसोजा, विजया राऊत आणि समीना दर्गावाले यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, भेटवस्तू व सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात स्वागत गीत विदुल पाटकर, सोनाली सावंत, मेघना राऊळ, श्रद्धा सावंत, साक्षी राणे व श्रद्धा नाईक यांनी सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेघना राऊळ यांनी केले.
या प्रसंगी उपाध्यक्ष राजेंद्र बिर्जे, अध्यक्ष दिगंबर पावसकर, सचिव प्रकाश राऊळ, सल्लागार अण्णा देसाई, मेघना राऊळ, श्रद्धा सावंत, संजना सावंत, विदुल पाटकर, दत्ताराम सडेकर, सुहासिनी सडेकर, सोनाली सावंत, शुभदा लाड, अलका डिसोजा, श्रद्धा नाईक, साक्षी राणे, शिल्पा साळगावकर, शशिकांत साळगावकर, मंगेश राऊळ, संजय नाटेकर, मेघा नाटेकर, मंगल राऊळ, नमिता बांदेकर, मिथिल भिसे, प्रज्ञा काणेकर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांसह अनेक नागरिकांनी उपस्थित राहून महिलांच्या कार्याचा गौरव केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा