You are currently viewing सावंतवाडीत हिंदू नववर्षानिमित्त भव्य स्वागत यात्रा

सावंतवाडीत हिंदू नववर्षानिमित्त भव्य स्वागत यात्रा

सावंतवाडीत हिंदू नववर्षानिमित्त भव्य स्वागत यात्रा;

१९ मार्च रोजी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होण्याचे आवाहन

सावंतवाडी

सावंतवाडी येथे हिंदू नववर्षाचे औचित्य साधून गुरुवार, १९ मार्च २०२६ रोजी भव्य स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदा, शालिवाहन शके १९४८ व युगाब्ध ५१२८ या निमित्ताने सायंकाळी ठीक ४ वाजता यात्रेला प्रारंभ होणार आहे.
ही यात्रा सावंतवाडी राजवाडा येथून सुरू होऊन नारायण मंदिर, गांधी चौक, जयप्रकाश चौक, शिवरामराजे पुतळा मार्गे पुढे जाऊन जगन्नाथ भोसले उद्यान येथे समारोप होणार आहे.
ढोल-ताशांच्या गजरात आणि पारंपरिक वातावरणात होणाऱ्या या यात्रेत नागरिकांनी पारंपरिक वेशभूषेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. “नववर्षाची सुरुवात संस्कृती जपत करूया” या संदेशासह ही यात्रा आयोजित करण्यात आली असून शहरातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा