सावंतवाडीत युवा वैश्यवाणी प्रिमिअर लीगला उत्साहात सुरुवात
माजी नगराध्यक्ष ॲड. दिलीप नार्वेकर यांच्या हस्ते उद्घाटन; जिमखाना मैदानावर दोन दिवस रंगणार सामने
सावंतवाडी :
हिंदू वैश्यवाणी युवा संघटना, सावंतवाडी यांच्या वतीने आयोजित युवा वैश्यवाणी प्रिमिअर लीग या क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ उत्साहात करण्यात आला. माजी नगराध्यक्ष ॲड. दिलीप नार्वेकर यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. ही क्रिकेट स्पर्धा दोन दिवस रंगणार असून स्थानिक खेळाडूंच्या सहभागामुळे क्रीडाप्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
जिमखाना मैदानावर या क्रिकेट लीगचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटन प्रसंगी माजी नगराध्यक्ष ॲड. दिलीप नार्वेकर यांनी खेळाडूंना शुभेच्छा देत स्पर्धा खेळाडूवृत्तीने पार पाडावी, असे आवाहन केले.
यावेळी बाळासाहेब बोर्डेकर, सभापती आनंद नेवगी, प्रतिक बांदेकर, सुकन्या टोपले, हिंदू वैश्यवाणी युवा संघटना अध्यक्ष अमित गवंडळकर, सल्लागार अरुण भिसे, प्रसाद नार्वेकर, बंड्या कोरगावकर, आबा केसरकर, श्रेयस मुंज, शैलेश गवंडळकर, नित्यानंद कोरगावकर, प्रशांत वाळके, जयेश स्वार, महेश बांदेकर, ऋतिक कोरगावकर, अण्णा म्हापसेकर, सलील वंजारी, रूपेश कुडतरकर, महेश देऊलकर, मेहर पडते, जतिन भिसे, बबलू मिशाळ, परेश बांदेकर, प्रसाद मिशाळ, प्रथमेश सुकी, देवेश पडते, संकेत नेवगी, चिरायु टोपले आदी उपस्थित होते.
