You are currently viewing डायबेटिक व हायपरटेन्सीव्ह रेटिनोपॅथी संदर्भात जिल्हा रुग्णालयात मोफत महाआरोग्य शिबिर संपन्न

डायबेटिक व हायपरटेन्सीव्ह रेटिनोपॅथी संदर्भात जिल्हा रुग्णालयात मोफत महाआरोग्य शिबिर संपन्न

डायबेटिक व हायपरटेन्सीव्ह रेटिनोपॅथी संदर्भात जिल्हा रुग्णालयात मोफत महाआरोग्य शिबिर संपन्न

सिंधुदुर्गनगरी

 डायबेटिक रेटिनोपॅथी व हायपरटेन्सीव्ह रेटिनोपॅथी या आजारासंबंधी जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग येथे मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. रोटरी क्लब सिंधुदुर्ग, मिरज, सांगली व जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर पार पडले.

या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

या महाआरोग्य शिबिराचा लाभ ७५ रुग्णांनी घेतला. तपासणीदरम्यान डायबेटिक रेटिनोपॅथी असलेले ८ रुग्ण पुढील उपचारासाठी मिरज येथे संदर्भित करण्यात आले आहे. डोळ्यांसंबंधी कोणतीही लक्षणे आढळल्यास नागरिकांनी त्वरीत जवळच्या शासकीय रुग्णालयातील नेत्रतज्ञांकडे तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. डवंगे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा