You are currently viewing ज्येष्ठ नागरिक संघ सावंतवाडीची सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिकेसाठी ५१,५०० रुपयांची देणगी

ज्येष्ठ नागरिक संघ सावंतवाडीची सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिकेसाठी ५१,५०० रुपयांची देणगी

ज्येष्ठ नागरिक संघ सावंतवाडीची सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिकेसाठी ५१,५०० रुपयांची देणगी

जिल्ह्यातील उत्कृष्ट सेवाभावी कार्याचे कौतुक; रुग्णसेवेसाठी संस्थेच्या उपक्रमाला हातभार

सावंतवाडी :

रुग्णांना तत्काळ सेवा देणाऱ्या सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सेवाभावी कार्याचे कौतुक करत सावंतवाडी येथील ज्येष्ठ नागरिक संघाकडून रुग्णवाहिका खरेदीसाठी ५१ हजार ५०० रुपयांची देणगी देण्यात आली. अण्णा देसाई व प्रा. सुभाष गोवेकर यांच्या पुढाकारातून ही देणगी संस्थेकडे सुपूर्द करण्यात आली.
यावेळी बोलताना अण्णा देसाई यांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान ही जिल्ह्यातील रुग्णांना तातडीची मदत देणारी उत्कृष्ट सेवाभावी संस्था असून तिचे कार्य प्रेरणादायी असल्याचे सांगितले. जिल्हाभर संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध सेवाभावी उपक्रमांचा अनुभव आम्हाला वारंवार येत असल्याचेही ज्येष्ठ नागरिकांनी यावेळी नमूद केले.
यावेळी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे प्रतिनिधी रवी जाधव व रूपा मुद्राळे यांनी संस्थेच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांच्या या सहकार्याबद्दल आभार मानले. ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेसाठी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान नेहमीच पाठीशी राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
संस्थेचे अध्यक्ष सतीश बागवे यांनी ज्येष्ठ नागरिक संघाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले. ज्येष्ठ नागरिक तरुणांप्रमाणे उत्साहाने शहरात सेवाभावी कार्य करत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी संस्थेच्या वतीने देणगीदारांचा आभारपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष दिगंबर पावसकर, सचिव प्रकाश राऊळ, उपाध्यक्ष राजेंद्र बिर्जे, सहसचिव विदुल पाटकर, सल्लागार अण्णा देसाई, सदस्या मेघना राऊळ तसेच सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, ‘सकाळ’चे वितरण अधिकारी गुरुनाथ कदम, सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव व रूपा मुद्राळे आणि अन्य सदस्य उपस्थित होते.
सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या निस्वार्थी सेवाभावी कार्याची दखल ज्येष्ठ नागरिकांनी घेतल्याबद्दल सर्व स्तरांतून या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा