*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अनुराधा जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*ऋतू देखणा… ऋतू वसंत*
(मुक्तछंद)
आम्रवृक्षावर कोकिळ गातो,
ऋतूराज आल्याची वर्दी देतो.
नवलाईचा हा ऋतू वसंत,
झाडाझुडपावर चैत्रपालवीचा बहर,
डोंगर टेकड्या, सजल्या,
पळस पांगारा गुलमोहर,
फुलूनी लालचुटूक झाल्या.
जाई जुई मोगरा अनंत,
एकमेकावर करताती कुरघोडी,
सजवत अवनीला मिरविती रंग देखणा.
पक्षी गाती सुस्वरे,
अंगणी सजली चैत्रांगणे रांगोळ्या,
दारावर लटकती झेंडूच्या माळा,
गुढीपाडवा रामजन्म हनुमान ऊत्सव,
परंपरा गाजती मांगल्याच्या.
आंबा कलिंगड टरबूज काकड्या,
आंबाडाळ कैरीचे मधुर पन्हे,
घरोघरी हळदीकूंवाचा थाट,
देखणा ऋतूराज वसंत,
खेळतो रंगपंचमी चैत्रगौरी संगती.
चैतन्य मांगल्य आनंद,
हवाहवासा देखणा ऋतूराज वसंत.
अनुराधा जोशी
अंधेरी मुं. 69
9820023605
