You are currently viewing जेष्ठ कवयित्री प्रज्ञा घोडके यांना ‘साहित्यरत्न सन्मान प्राप्त
Oplus_16908288

जेष्ठ कवयित्री प्रज्ञा घोडके यांना ‘साहित्यरत्न सन्मान प्राप्त

 

जेष्ठ कवयित्री प्रज्ञा घोडके यांचा खरा साहित्य प्रवास सन २०१७ पासून सुरू झाला. तशी त्यांना लहानपणापासूनच लेखन, वाचनाची आवड होतीच. पण खर्‍या अर्थाने सन १९८७-८८ पासून दैनिक वृत्तपत्र माध्यमातून लेख, कविता, कथा प्रसिद्घ होऊ लागले आणि त्यांना साहित्यात आवड निर्माण झाली. वयाच्या २२ व्या वर्षी त्यांचा एस.टी. भीषण अपघात झाला. त्यातून त्यांनी मृत्यूला हरवले परंतू त्यात डावा डोळा गमावला. तर कमरेच्या मणक्याने वयाच्या ३८ व्या वर्षापासून असह्य दुखणे वर काढले. कमरेवर दोन शस्त्रकर्म होऊनही आजपर्यंत अनेक उपचारही सुरू आहेत. पण त्या वेदनामुक्तीसाठी साहित्याच्या छंदात रात्रंदिवस स्वत:ला झोकून देत आहेत. स्वसृजनाचा आनंद हा अवर्णनीय असतो.

 

हळूहळू त्यांनी रजिस्टर्ड संस्थांच्या मोजक्याच साहित्यिक समूहात सामिल होऊन ऑनलाइन स्पर्धेत भाग घेणे सुरू त्यामुळे त्यातून मिळालेल्या विविध विषयांनी लेखनास चालना व प्रेरणा मिळाली. एवढेच नव्हे तर अवघ्या ९ वर्षात ९ साहित्यिक अपत्ये जन्माला घातली. (८ काव्यसंग्रह व एक लघुकथा व लेखसंग्रह).

 

आजकाल पुरस्कार मिळणे ही फार मोठी गोष्ट नसते. पण पुरस्कार देण्यातही काही संस्था पैसे देऊन पुरस्कार देतात आणि प्रसिद्घीसाठी काही साहित्यिक तो घेतातही. याचे त्यांना नवल वाटते. पण त्या असे कधीच करत नाही. कारण असा पुरस्कार विकत घेणे म्हणजे स्वत:ची पाठ स्वत: थोपटून घेणे असे त्यांचे प्रांजळ मत आहे. स्वसृजनाचा स्वानंद अवर्णनीय असतो. त्याची अशी किंमत करणे म्हणजे ते विकणे वाटते.

 

अष्टपैलू संस्कृती कला अकादमी मुंबई, ही शैक्षणिक, पारमार्थिक, सांस्कृतिक, सामाजिक विषयक आवाज उठवणारी संस्था असून खरोखरच निरपेक्ष कार्य करते.साहित्यिकांना योग्य, रास्त मार्गदर्शन करते. याचा त्यांनी गेली चार वर्षे अनुभव घेतला आहे. या संस्थेशी त्या सन २०२२ पासून काव्यस्पर्धेच्या माध्यमातून सहभागी आहेत. या चार वर्षात सदर संस्थेकडून राज्यस्तरीय *’काव्यगौरव’* ते *’साहित्यरत्न’* पर्यत सलग चार सन्मान त्यांना मिळाले. याचा अवर्णनीय आनंद होत आहे. यापुढेही मी साहित्यात सक्रीय राहणारच आहे पण… ते फक्त पुरस्कार मिळावे म्हणून नाही तर माझ्या स्वृसजनाच्या स्वानंदासाठी. म्हणूनच अष्टपैलू संस्कृती कला अकादमीच्या आयोजकांपासून परीक्षकांपर्यंत सर्व मान्यवरांचे मनस्वी आभार मानते असे त्या आवर्जून सांगतात.

प्रतिक्रिया व्यक्त करा