You are currently viewing कणकवली-देवगड-वैभववाडी तालुक्यातील रस्ते विकासाला गती; २५ कोटींच्या कामांना मंजुरी

कणकवली-देवगड-वैभववाडी तालुक्यातील रस्ते विकासाला गती; २५ कोटींच्या कामांना मंजुरी

पालकमंत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश; सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली अर्थसंकल्पीय निधीतून मंजुरी

 

कणकवली :

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, देवगड आणि वैभववाडी तालुक्यातील रस्ते विकासाच्या कामांना गती मिळाली असून या तालुक्यांमधील विविध रस्ते दुरुस्ती व डांबरीकरणासाठी एकूण २५ कोटी रुपयांच्या विकास कामांना मंजुरी देण्यात आली आहे.

मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केलेल्या पाठपुराव्यानुसार सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी अर्थसंकल्पीय निधीतून या कामांना मंजुरी दिली आहे. त्यामुळे या तीनही तालुक्यांतील अनेक महत्त्वाच्या रस्त्यांची सुधारणा व डांबरीकरण होणार असून स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मंजूर करण्यात आलेल्या कामांमध्ये कणकवली तालुक्यातील कणकवली-शिवाजीनगर-फोंडा रस्ता, संभाजीनगर-वेगणी रस्ता, आचिर्णे-कळंब इमसट रस्ता तसेच शिवल-शिवडाव दरिस्ते येथे लहान पुलाचे बांधकाम यांचा समावेश आहे.

तसेच वैभववाडी तालुक्यातील खारेपाटण-तिवरे तसेच फोंडा-उंबरे मार्गावरील रस्त्यांच्या सुधारणा व डांबरीकरणाची कामेही मंजूर करण्यात आली आहेत.

देवगड तालुक्यातील तांबाळे-केंकवण, सिरीये मार्ग, आरे-पाटणसाळ, सांडवे, नांदगाव-राहाटी तसेच लिंगडाळ या मार्गांवरील रस्त्यांचेही सुधारणा व डांबरीकरण करण्यात येणार आहे.

१) SH १२८ – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील कणकवलीपासून आणि शिवाजीनगरपासून फोंडा, पर्यंतचा रस्ता रा.मा. १२८ कि.मी. ४५.००० ते ६२.४५० मध्ये सुधारणा व डांबरीकरण करणे — २ कोटी ५० लाख

२) SH १२८ – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील रा.मा.६६ खारेपाटण पासून तिवरेपर्यंत चा रा.मा.१२७ रस्त्यामध्ये कि.मी. ४.४०० ते ४.७००, ९.०० ते ९.०००, १२.०५० ते १२.६००, १२.९५० ते १३.२००, ३४.२०० ते ३४.९०० ची सुधारणा व डांबरीकरण करणे — २ कोटी ५० लाख

३) SH १२८ – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील फोंडा, उंबरे पर्यंत रस्ता रा.मा.१२८ कि.मी. ६१.४०० ते ७१.०५०, ७४.६०० ते ७५.१००, ८२.२०० ते ८२.३००, ८७.२०० ते ८८.००० मध्ये सुधारणा व डांबरीकरण करणे — २ कोटी ५० लाख

४) MDR २५ – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील शिवल शिवडाव दरिस्ते प्र.जि.मा.-२५ कि.मी. ३/४०० येथे लहान पुलाचे बांधकाम करणे — १ कोटी

५) MDR १ – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील संभाजीनगर पासून, वेगणी पर्यंत रस्ता प्र.जि.मा.१ कि.मी. ६/४०० ते ७/८०० मध्ये सुधारणा व डांबरीकरण करणे (तालुका – कणकवली) — २ कोटी

६) MDR ५ – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील तांबाळे हद्द पासून, केंकवण प्र.जि.मा.५ पर्यंत च्या कि.मी. ३/००० ते ७/००० रस्त्यामध्ये सुधारणा व डांबरीकरण करणे (तालुका – देवगड) — २ कोटी

७) MDR ७ – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील आचिर्णे पासून, कळंब इमसट पर्यंतचा रस्ता प्र.जि.मा.७ कि.मी. ०/००० ते ४/२००, कि.मी. ७/००० ते ८/३५० मध्ये सुधारणा व डांबरीकरण करणे (तालुका – कणकवली) — २ कोटी ५० लाख

८) MDR २४ – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील सिरीये पासून, प्र.जि.मा.-२४ पर्यंत कि.मी. २५/६०० ते ४३/२०० मध्ये रस्त्याचे सुधारणा व डांबरीकरण करणे (तालुका – देवगड) — १ कोटी ६० लाख

९) MDR १६– सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील आरे पाटणसाळ, प्र.जि.मा.-१६ पर्यंत कि.मी. ७/००० ते १२/००० मध्ये रस्त्याचे सुधारणा व डांबरीकरण करणे (तालुका – देवगड) — १ कोटी ६० लाख

१०) MDR ११ – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील सांडवे प्र.जि.मा.-११ कि.मी. ०/००० ते ६/६५० मध्ये रस्त्याचे सुधारणा व डांबरीकरण करणे (तालुका – देवगड) — १ कोटी ६० लाख

११) MDR २० – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील हुंबर सावडाव ओवट रस्ता प्र.जि.मा.२० वरील कि.मी. ०/००० ते ६/६५० मध्ये रस्ता सुधारणा करणे — १ कोटी ५० लाख

१२) MDR ९ – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील रा.मा.-२७७ पर्यंत प्र.जि.मा.९ रस्त्याचे कि.मी. ६/००० ते ९/२००, १८/००० ते २९/००० सुधारणा व डांबरीकरण करणे (तालुका – देवगड) — २ कोटी ५० लक्ष

१३) MDR ९– सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील सांडवे पासून प्र.जि.मा.९ कि.मी. २१/२०० ते २०/३०० व कि.मी. ३६/००० ते ४३/०७० मध्ये रस्त्याचे सुधारणा व डांबरीकरण करणे (तालुका – देवगड) — २ कोटी

१४) MDR २२– सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील नांदगाव पासून, राहाटीपर्यंत प्र.जि.मा.-२२ कि.मी. ८/५०० ते २७/००० मध्ये रस्त्याचे सुधारणा व डांबरीकरण करणे (तालुका – देवगड) — १ कोटी ६० लाख

१५) MDR २३ – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील लिंगडाळ प्र.जि.मा.-२३ कि.मी. ०/००० ते ७/००० मध्ये रस्त्याचे सुधारणा व डांबरीकरण करणे (तालुका – देवगड) — १ कोटी ६० लाख

या सर्व कामांमुळे कणकवली, देवगड आणि वैभववाडी तालुक्यातील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम होणार असून स्थानिक नागरिक व वाहनचालकांना सुरक्षित व सोयीस्कर प्रवास करता येणार आहे. तसेच या भागातील विकासाला चालना मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा