You are currently viewing मालवण पंचायत समिती सभापतीपदी प्रज्ञा चव्हाण, उपसभापतीपदी धनश्याम झाड बिनविरोध
Oplus_16908288

मालवण पंचायत समिती सभापतीपदी प्रज्ञा चव्हाण, उपसभापतीपदी धनश्याम झाड बिनविरोध

महायुतीचे निर्विवाद वर्चस्व; शिवसेना-भाजप फॉर्म्युल्यानुसार पदांची विभागणी

मालवण : प्रतिनिधी

शिवसेना-भाजप महायुतीचे निर्विवाद वर्चस्व असलेल्या मालवण पंचायत समिती सभापतीपदी शिवसेना महायुतीच्या सौ. प्रज्ञा भाऊ चव्हाण तर उपसभापतीपदी भाजपा महायुतीचे धनश्याम चंद्रकांत झाड यांची बिनविरोध निवड झाली आहे.

खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वात सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुती भक्कम आहे. आमदार निलेश राणे, पालकमंत्री नितेश राणे, भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात सभापती, उपसभापती व सर्व सदस्य लोकाभिमुख कारभार करतील. जनतेच्या सेवेसाठी आणि गतिमान विकासासाठी महायुती कटिबद्ध असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी सांगितले.

मालवण पंचायत समिती सभापती-उपसभापती पदाची निवड पंचायत समिती सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार गणेश लव्हे यांच्या उपस्थितीत पार पडली.

यावेळी शिवसेना गटनेते छोटू ठाकूर, सदस्य मानसी भोगावकर, प्रज्ञा दीपक चव्हाण, गणेश तोंडवळकर, रिया बावकर तसेच भाजपचे गटनेते दीपक सुर्वे, रीमा परुळेकर, श्याम झाड, माधुरी मसुरकर, संतोष गावडे, योजना कांबळी आदी सदस्य उपस्थित होते.

महायुती फॉर्म्युल्यानुसार सभापतीपद शिवसेनेकडे तर उपसभापतीपद भाजपाकडे निश्चित झाले. त्यानुसार सभापती पदासाठी आमदार निलेश राणे यांच्या सूचनेनुसार तालुकाप्रमुख मंदार लुडबे यांनी प्रज्ञा चव्हाण यांचे नाव जाहीर केले. तर भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी वरिष्ठांच्या सूचनेनुसार उपसभापती पदासाठी श्याम झाड यांचे नाव जाहीर केले.

शिवसेना गटनेते छोटू ठाकूर व भाजपा गटनेते दीपक सुर्वे यांच्या सूचक स्वाक्षरीने सभापती व उपसभापती पदाचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. दुपारी ३ वाजता पिठासीन अधिकारी तहसीलदार गणेश लव्हे यांनी सभापती व उपसभापती यांची बिनविरोध निवड जाहीर केली. यावेळी गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांनी नवनिर्वाचित सभापती-उपसभापतींचे अभिनंदन केले.

सभापती प्रज्ञा चव्हाण व उपसभापती श्याम झाड यांचे शिवसेना-भाजपा पदाधिकारी, अधिकारी तसेच मित्रपरिवाराकडून अभिनंदन करण्यात आले. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे, माजी उपसभापती राजू परुळेकर, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, महिला बालकल्याण सभापती अन्वेषा आचरेकर, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, आचरा सरपंच जेरोन फर्नांडिस, जिप सदस्य क्षमा हडकर, संतोष सातविलकर, सुमेधा पाताडे, नगरसेवक मंदार केणी, ललित चव्हाण, महानंदा खानोलकर यांसह महेश मांजरेकर, संतोष गावकर, विजय निकम, दाजी सावजी, देवेंद्र हडकर, महेश बागवे, नाभिक संघटना जिल्हाध्यक्ष जगदीश चव्हाण, विजय चव्हाण, जुगू चव्हाण, भाऊ चव्हाण, श्याम वाक्कर, बाबू परब, पंकज वर्दम, शिवरामपंत पालव, युवासेना तालुकाप्रमुख अभि लाड, स्वप्नील गावडे, तालुकाप्रमुख मधुरा तुळसकर, प्रकाश तोंडवळकर, मनोज हडकर, देवानंद लोकेगांवकर, मुद्रा झाड यांसह पदाधिकारी व नातेवाईक मित्रपरिवार यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा