You are currently viewing कुडाळ गावठी बाजारातील कष्टकरी महिलांचा भाजप महिला मोर्चाकडून सन्मान

कुडाळ गावठी बाजारातील कष्टकरी महिलांचा भाजप महिला मोर्चाकडून सन्मान

कुडाळ गावठी बाजारातील कष्टकरी महिलांचा भाजप महिला मोर्चाकडून सन्मान

कुडाळ

जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून भाजप महिला मोर्चा सिंधुदुर्ग, कुडाळ यांच्या वतीने कुडाळ येथील गावठी बाजारातील कष्टकरी महिलांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. या उपक्रमातून महिलांच्या कष्टाला व त्यांच्या समाजातील महत्त्वपूर्ण योगदानाला मानाचा मुजरा देण्यात आला.
या प्रसंगी भाजप जिल्हा महिला मोर्चा सरचिटणीस सौ. अदिती सावंत, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सौ. ममता धुरी, सौ. साधना साठ्ये, सौ. विशाखा कुलकर्णी, सौ. कविता कुंटे व सौ. संपदा घाटे उपस्थित होत्या. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी कष्टकरी महिलांशी संवाद साधून त्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या व त्यांच्या कार्याचे कौतुक केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा