*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*
*स्त्री…महिला दिन*
कधी होऊन *आई*
गाते गीत अंगाई
तिच्याच पदरात मिळते
स्वर्गसुख मोठं बाई :१:
*बहीण* भावाची लाडी
बांधुन राखी हाताला
उदंड आयुष्य मागते
अयोध्येच्या श्रीरामाला:२;
बटव्यातून काढून देते
पोट दुखताचं ओवा
*आजीच्य* प्रेमात मिळते
साऱ्या दुनियेचा ठेवा :३:
येता दिवाळी दसरा
*आत्या* येते माहेराला
पाहुनी दोन दिवसांची
खाऊ आणते पदराला:४:
माय मरो *मावशी* जगो
जगाची न्यारी रीत
अर्धे सुख पदरात तिच्या
मावशीची नवी प्रीत :५:
सात जन्माची बांधुन गाठ
माप ओलांडते दरवाजाचे
ऋणानुबंधाच्या बांधुन गाठी
कार्य करते *पत्नीधर्माचे* :६:
*आई,बहीण,मावशी,आजी*
नाती असती आयुष्याला
त्यांच्या विना जीवनात
मजा नाही जगण्याला:७:
*शीला पाटील. चांदवड.*
