You are currently viewing मोरगाव शाळेत आयोजित इतिहासाची साधने प्रदर्शनास उत्स्फुर्त प्रतिसाद

मोरगाव शाळेत आयोजित इतिहासाची साधने प्रदर्शनास उत्स्फुर्त प्रतिसाद

*मोरगाव शाळेत आयोजित इतिहासाची साधने प्रदर्शनास उत्स्फुर्त प्रतिसाद* .

दोडामार्ग

दुर्ग मावळा प्रतिष्ठान, दुर्ग रक्षक प्रतिष्ठान रेडी आणि नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था भारत यांच्या यांच्या संयुक्त विद्यमाने जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा मोरगाव नं. १ येथे आयोजित करण्यात आलेल्या इतिहासाची साधने व प्रदर्शन कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या प्रदर्शनामध्ये हत्यारे, नाणी, पुस्तके, छायाचित्रे सुंदर पद्धतीने मांडण्यात आली. इ. १ ली ते ७ वी च्या वि‌द्यार्थ्यांना विविध प्रकारची शस्त्रास्त्रे प्रत्यक्ष हाताळायला देऊन त्याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. ज्ञानेश्वर राणे व त्यांचे सहकारी आबा चिपकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास विविध प्रसंगातून मुलांसमोर सादर केला. सिंधुदुर्ग किल्ला, विजयदुर्ग किल्ल्यावरील छत्रपती शिवाजीमहाराजांच्या अविस्मरणीय आठवणी व मौल्यवान वस्तु याबदद्‌ल देखील सविस्तर माहिती दिली. मोरगाव अंगणवाडीचे विद्यार्थी व पालक यांनी प्रदर्शनास भेट दिली. सदर कार्यक्रम अंगणवाडी ताई हेमा नाईक यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आला. यावेळी मुख्याध्यापिका भाग्यश्री कुबल , शिक्षक ज्ञानेश्वर सावंत, संतोष गवस , स्वाती पाटील, अंगणवाडी मदतनीस सुप्रिया कदम तसेच पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .

प्रतिक्रिया व्यक्त करा