भोसले नॉलेज सिटीचा पीएचएन टेक्नॉलॉजी सोबत सामंजस्य करार….
रोबोटिक्स, ड्रोन व एआय एमएल प्रशिक्षणासाठी ॲडव्हान्स लॅब उभारणी….
भोसले नॉलेज सिटी अंतर्गत कार्यरत विविध महाविद्यालयांनी पुणे येथील तंत्रज्ञान व कौशल्याधारित प्रशिक्षण देणाऱ्या पीएचएन टेक्नॉलॉजी या संस्थेसोबत महत्त्वपूर्ण सामंजस्य करार केला. या कराराअंतर्गत यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधील डिग्री व डिप्लोमा विभाग तसेच यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी अशा तीन संस्थांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण व उद्योगाभिमुख उपक्रम राबविण्यात येणार आहेत. याचा मुख्य उद्देश संस्थेमध्ये अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी लॅबची स्थापना, उद्योग व शैक्षणिक क्षेत्रातील संवाद वाढविणे आणि विद्यार्थ्यांना इंडस्ट्री ओरिएंटेड शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हा आहे.
करारानुसार संस्थेत उभारण्यात येणाऱ्या अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी लॅबमध्ये ड्रोन, थ्री डी प्रिंटर, रोबोटिक डॉग, रोबोटिक आर्म, प्रगत सेन्सर्स, विविध तांत्रिक किट्स, एआय एमएल आधारित उपकरणे तसेच सीएनसी प्लॉटर यांसारखी आधुनिक साधने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार असून त्यांची उद्योग क्षेत्रासाठीची तयारी अधिक सक्षम होणार आहे.
या प्रसंगी भोसले नॉलेज सिटीचे सीईओ ले.कर्नल रत्नेश सिन्हा (नि), वायबीआयटी प्राचार्य डॉ.रमण बाणे, उपप्राचार्य गजानन भोसले, वायबीसीपी प्राचार्य डॉ.विजय जगताप, ट्रेनिंग प्लेसमेंट सेल अधिकारी मिलिंद देसाई, डॉ.तुषार रूकारी, प्रा.नमिता भोसले, सिव्हिल विभागप्रमुख प्रसाद सावंत, प्रा.मनोज खाडिलकर, प्रा.स्वप्निल राऊळ व पीएचएन टेक्नॉलॉजीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
