You are currently viewing सावंतवाडीच्या मुक्ताई ॲकेडमीच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत चमकदार कामगिरी

सावंतवाडीच्या मुक्ताई ॲकेडमीच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत चमकदार कामगिरी

सावंतवाडीच्या मुक्ताई ॲकेडमीच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत चमकदार कामगिरी

डेरवण (चिपळूण) येथे पार्थ गावकर नववा; चिदानंद रेडकरला १६०० रेटिंग गटात तिसरे स्थान

सावंतवाडी

डेरवण, चिपळूण येथे विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्टतर्फे आयोजित करण्यात आलेल्या सोळा वर्षाखालील राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सावंतवाडी येथील मुक्ताई ॲकेडमीच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत आपली छाप पाडली. महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यांमधील एकूण १०६ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. एस.व्ही.जे.सी. ट्रस्टतर्फे गेली बारा वर्षे ही बुद्धिबळ स्पर्धा आयोजित केली जात असून मुक्ताई ॲकेडमीचे विद्यार्थी मागील नऊ वर्षांपासून सातत्याने या स्पर्धेत सहभागी होत उल्लेखनीय यश मिळवत आहेत.
या स्पर्धेत ॲकेडमीचे हर्ष राऊळ, पार्थ गावकर, अथर्व वेंगुर्लेकर, पुष्कर केळूसकर या आंतरराष्ट्रीय रेटेड विद्यार्थ्यांसह सात वर्षीय आकाश वाटवे, चिदानंद रेडकर, लिएण्डर पिंटो आणि दर्श सावंत यांनी सहभाग घेतला.
सात राऊंड्सच्या या स्पर्धेत मुख्य गटात पार्थ गावकर याने पाच गुण मिळवत नववा क्रमांक पटकावला, तर हर्ष राऊळ याने पाच गुणांसह बारावा, पुष्कर केळूसकर याने पाच गुणांसह तेरावा आणि लिएण्डर पिंटो याने पाच गुणांसह पंधरावा क्रमांक मिळवला. तसेच १६०० रेटिंग गटात चिदानंद रेडकर याने पाच गुण मिळवत तिसरा क्रमांक पटकावला.
मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष व बुद्धिबळ प्रशिक्षक कौस्तुभ पेडणेकर तसेच जिल्ह्यातील टॉप रेटेड आंतरराष्ट्रीय खेळाडू बाळकृष्ण पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले. पारितोषिकप्राप्त विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. या यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा