You are currently viewing मालवणमध्ये ८ मार्चला जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
Oplus_16908288

मालवणमध्ये ८ मार्चला जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

मामा वरेरकर नाट्यगृह पटांगणात पाककला स्पर्धा व ‘खेळ पैठणीचा’ उपक्रम; विजेत्यांना आकर्षक बक्षिसे

मालवण :

जागतिक महिला दिनानिमित्त मालवण नगरपरिषद महिला व बालकल्याण समिती यांच्या वतीने ८ मार्च रोजी मामा वरेरकर नाट्यगृह पटांगण येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात नाचणीपासून बनवलेल्या पदार्थांची पाककला स्पर्धा तसेच ‘खेळ पैठणीचा’ या विशेष उपक्रमांचा समावेश असणार आहे.

हा कार्यक्रम दुपारी २.३० ते सायंकाळी ६.०० या वेळेत पार पडणार आहे. मालवण शहरातील मर्यादित महिला व मुलींसाठी नाचणीपासून बनविलेल्या पदार्थांची पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली असून प्रथम नाव नोंदणी करणाऱ्या २५ महिलांना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.

स्पर्धेतील विजेत्यांना मालवण नगरपरिषद महिला व बालकल्याण समितीच्या वतीने आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. तसेच मालवण शहरातील महिला व मुलींसाठी ‘खेळ पैठणीचा’ हा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला असून त्यामधील विजेत्यांनाही विशेष बक्षिसे दिली जाणार आहेत.

दरम्यान, पाककला स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी नाव नोंदणीसाठी श्री. खेमराज सावंत (मो. ९५४५७९८८०२) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा