इचलकरंजी : महान कार्य वृत्तसेवा येथील जयवंत महाविद्यालयात इंग्रजी विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष मार्फत नुकताच ‘अहवाल आणि प्रकल्प लेखन’ या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
उद्घाटन सत्रात इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. डॉ. वैजयंता पाटील यांनी कार्यशाळेचा उद्देश विशद केला. प्रथम सत्रामध्ये सहकारभूषण एस. के. पाटील महाविद्यालयाचे प्रा. डॉ. सुभाष तांबडे यांनी अहवाल व प्रकल्प लेखन कशा पद्धतीने असायला हवे ? याबद्दल शास्ञशुध्द पध्दतीने मार्गदर्शन केले.
द्वितीय सत्रामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलावर जमादार यांनी प्रकल्प व अहवाल लेखनाचे विविध पैलू सांगितले. कार्यशाळेचे प्रास्ताविक व प्रमुख वक्त्यांचा परिचय प्रा. राकेश शेटके यांनी करून दिला. यावेळी इंग्रजी विभागामार्फत विद्यार्थ्यांनी बनवलेल्या पोस्टरचे विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले.
यावेळी डॉ. ए. वाय. आवळे, डॉ. रफिक सूरज, प्रा. विजय साठे, प्रा. गजेंद्र माळी, प्रा, सुनील बुड्ढे, प्रा. डॉ. मोहन जोशी, प्रा. डॉ. वसंत भागवत, प्रा. अक्षय सावंत, प्रा. वनिता पाटील यांच्यासह अन्य प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. उज्वला चौगुले यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. देवकी जाधव यांनी केले.
