कुडाळ :
कुडाळ तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कुडाळ येथील शिवसेना शाखेत आज मोठ्या उत्साहात तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. जय भवानी,जय शिवाजी! छत्रपती शिवाजी महाराज कि जय!, असा जयघोष करण्यात आला. माजी आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ येथे उपस्थित राहून महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले.
याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट,तालुकाप्रमुख राजन नाईक,तालुकाप्रमुख कृष्णा धुरी, तालुका संघटक बबन बोभाटे, तालुका संघटक सचिन कदम , उपतालुका प्रमुख बाळा कोरगांवकर,जिल्हा परिषद सदस्य गंगाराम सडवेलकर, पंचायत समिती सदस्य योगेश धुरी, बाळा कांदळकर, शहरप्रमुख संतोष शिरसाट, संजय गांधी निराधारचे माजी अध्यक्ष अतुल बंगे,उपविभाग प्रमुख मंगेश बांदेकर, कुंदे सरपंच रुपेश तायशेटे, शाखा प्रमुख विरेश परब, युवासेना शहर समन्वयक अमित राणे, गौरीशंकर कदम, नंदू आंबेरकर, विनय पालकर आदींसह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
