*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*मायलेकरू…*
किती गाढ झोपला हा आईच्या पाळण्यात
ती चालली उन्हात हेलकावत तो सुखात…
मिटून ते घट्ट ओठ नेत्रात नीज गाढ
ती तापल्या उन्हात बाळास काय पाड..
बांधून पोट घट्ट मोळीस एक हात
घरट्यात पोहचताच शिजविल तीच भात..
नाही तमा उन्हाची घरटेच एक लक्ष
वर तळपत्या उन्हात बाळाकडेही लक्ष..
ना वाटतेच ओझे आईपणा तो थोर
पाठीस आईच्या त्या लेकरू पहा बिनघोर…
जाळूनी ती जवानी इंधन पेटविल
त्या तप्त झळातूनीही बाळास पहा घडविल..
आई असे हो नाव नेतेच पैलतीरा
ते ऊन असू दे वा वारा असो भरारा..
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
