You are currently viewing जगण्याचा.. खोटा आव…!

जगण्याचा.. खोटा आव…!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*जगण्याचा.. खोटा आव…!*

 

मारून मारूनही वास्तव

मरता मरत नाही

पापांना बांधूनही पापं

थांबवता आली नाही…

 

जगणं कोंडीतलं धुंडाळतांना

कर्मबंधनातून सुटलो नाही

डाग पडले आयुष्यावर

अंतःकरणाला कर्ता नाही..

 

खूप उशीर झाला

जगण्याचा आव आणला

थोडसं जगणं कळलं

सोंगानी पाठपुरावा सोडला..

 

धीर देणारे ..सोबतीचे

प्रहराआड …दिसेनासे झाले

जन्माचे अंतर कापता -कापता

कारुण्य …जगण्याला आले..

 

व्याकुळ काळजाच्या दारी

ह्दयाचा ….जाच उगा

जगण्याचा खोटा आव

कंगालाचा ..भास जगा…

 

बाबा ठाकूर

प्रतिक्रिया व्यक्त करा