You are currently viewing शेवटचा हा इशारा तुम्हाला

शेवटचा हा इशारा तुम्हाला

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*शेवटचा हा इशारा तुम्हाला*

(21)

कर्तव्याची राखून *बूज*

प्रेम करावे *पशु पक्षांवर*

झाडे वाचवा होळी न लावून

प्रेम करावे *वृक्ष लतांवर*…….1

रंग उधळावे सुंदर गुणांचे

घालवू नये कधी बुध्दी वाया

नका होऊ देऊ -हास तिचा

आधी शिका संचय कराया…….2

वर्षभराचा *राग* साठतो

निमित्त मिळते दहन कराया

अप शब्दांना घालून बंधन

चूड लावून आज *पेटवुया*…….3

होलीका देवीचा राखूत मान

वाईट वृत्तीचे करु *दहन*

विविध लाकडे होळी मधली

त्यांचे राखेने करावे *स्नान*…….4

संदेश देऊया कृतघ्न प्रवृत्तिला

लागायचे नाही आमचे वाटेला

नका जळू *उगा कुणावर*

*शेवटचा हा इशारा तुम्हाला*…5

 

विनायक जोशी🖋️ ठाणे

मीलनध्वनी/9324324157

प्रतिक्रिया व्यक्त करा