You are currently viewing साळगाव हायस्कूल साठी 15000 रुपयांची देणगी

साळगाव हायस्कूल साठी 15000 रुपयांची देणगी

साळगाव हायस्कूल साठी 15000 रुपयांची देणगी

कुडाळ

शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, साळगाव यांच्या भौतिक सुविधांच्या पूर्ततेसाठी सौ. मीनाली मिलिंद चिंदरकर (पूर्वाश्रमीची दुर्गा साळगावकर) यांनी आपले वडिल कै. आत्माराम उर्फ काका साळगावकर यांच्या पवित्र स्मरणार्थ ₹15000/- ची उदार देणगी दिली. 🙏

ही देणगी शिक्षण प्रसारक मंडळ, झाराप यांच्याकडे धनादेशाद्वारे सुपूर्त करण्यात आली.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. मुकुंद धुरी, सचिव मा. श्री. प्रदीप प्रभूतेंडोलकर, मुख्याध्यापक सलीम तकीलदार तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

सौ. मीनाली चिंदरकर यांची ही समाजाभिमुख व शिक्षणप्रेमी भावना निश्चितच प्रेरणादायी आहे. त्यांच्या या योगदानामुळे विद्यालयाच्या भौतिक सुविधांमध्ये अधिक बळकटी येणार असून विद्यार्थ्यांना त्याचा निश्चित लाभ होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा