You are currently viewing जीवन म्हणजे अळवावरचे पाणी

जीवन म्हणजे अळवावरचे पाणी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठानच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री डॉ.सौ. मानसी पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*जीवन म्हणजे अळवावरचे पाणी* 

 

हे जीवन‌ म्हणजे अळवावरचे पाणी

गा आनंदाने सुखदुःखाची गाणी

 

ना रूसवेफुगवे भांडणतंटा जेथे

नांदती सुखाने रमा शारदा तेथे

 

मन स्वच्छ असावे शुद्ध असावी वाणी

मग सजे जीवनी सुमनांची फुलदाणी

 

जप सुंदर नाती रेशमधागे त्यांचे

नच कटुता स्वार्थी अहंपणा द्वेषाचे

 

क्षणभंगुर वाटे प्रवास आयुष्याचा

सद्ववर्तनी मिळे सुवास चारित्र्याचा

 

©️®️डॉ मानसी पाटील

प्रतिक्रिया व्यक्त करा