You are currently viewing रद्दी

रद्दी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*रद्दी*

 

मेहनत कष्टाचा घाम गाळत

मिळणाऱ्या चार पैशांनी

मुलांची शाळा सुरू झाल्या पासून

पप्पांनी मुलांना शाळेत

शिकण्यासाठी पाठवलं

 

वर्षभराचा शिक्षणाचा

लेखाजोखा न ठेवताही

पेन्सिल,पेन,दप्तर, गणवेश पासून

शाळेची फी, शिकवणी,बसची फी,

आणि पुस्तके वह्या

सगळेच

कसलाही विचार न करता

पैसे देऊन विकत घेऊन

मुलांना

वर्षभराच्या इयत्तेत सोपवलं…

 

मुलांनी शिकून सवरून

सुशिक्षित सुसंस्कृत व्हावं

मोठा साहेब व्हावं

मोठा पैसेवाला व्हावं म्हणून…

 

मुलांच्या परिक्षा संपल्या

शाळांना सुट्ट्या लागल्या

पाठ्यक्रम बदलणार म्हणून

शिक्षण घेतलेल्या

ज्ञान देणाऱ्या

महान लेखकांचे लिखाण असलेल्या त्या पुस्तकांचा

आता काय उपयोग

म्हणून

पप्पा रद्दी विकून आले

तेवढेच चार पैसे

घरात येतील

घर खर्चासाठी

घर चालवायचंय म्हणून. …..

 

कवी:-

*चंद्रशेखर प्रभाकर कासार*

*चांदवडकर,धुळे.*

७५८८३१८५४३.

८२०८६६७४७७.

प्रतिक्रिया व्यक्त करा