You are currently viewing वेंगुर्ला तालुक्यात नववर्ष स्वागत यात्रा २०२६ होणार भव्यदिव्यतेने

वेंगुर्ला तालुक्यात नववर्ष स्वागत यात्रा २०२६ होणार भव्यदिव्यतेने

हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती, वेंगुर्ले संयोजकपदी गिरीष गंगाधर फाटक यांची निवड

वेंगुर्ला  :

वेंगुर्ला तालुक्यात नववर्ष स्वागत यात्रा २०२६ भव्यदिव्य पद्धतीने करण्यात येणार आहे, अशी माहिती हिंदू धर्माभिमानी मंडळी च्या वतीने बाबुराव खवणेकर यांनी दिली. नववर्ष स्वागत यात्रा २०२६ ची पहिली नियोजन बैठक शनिवारी सायंकाळी विठ्ठल मंदिर येथे पार पडली. यावेळी प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, नित्यानंद आठलेकर,आशिष पाडगावकर, राजन केरकर, वसंत तांडेल, विद्याधर कडुलकर, तुळशीदास ठाकूर, अजय गडेकर, साईप्रसाद नाईक, रिया केरकर, ऍड. सुषमा प्रभूखानोलकर, गौरी मराठे, सुजाता पडवळ, वृंदा मोर्डेकर, वैभव होडावडेकर, अभि वेंगुर्लेकर, युवराज ठाकूर, दिनेश आचार्य, गुरुप्रसाद प्रभुखानोलकर, अमित नाईक, अमोल आरोसकर , संजय तेरेखोलकर , गिरीष फाटक आदी हिंदू धर्माभीमानी बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी संपूर्ण तालुक्यातील विविध समाजाचे, संस्थाचे, सामाजिक कार्यातील मान्यवर,शहरातील, तालुक्यातील विविध पदाधिकारी , महीला मंडळ , युवक मंडळ , विवीध सांप्रदाय यांची एकत्रित नववर्षाची यात्रा गतवर्षीपेक्षा भव्यदिव्य करण्यासाठी शहर व संपूर्ण तालुक्यातील हिंदू धर्माभिमानी यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी विशेष बैठका घेण्यात येऊन पुढील नियोजन करण्यात येणार आहे, असे यावेळी प्रसन्ना देसाई यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा