वेंगुर्लेत कु. रणवीर (कार्तिक) सिंग यांचा हिंदुधर्माभिमानी मंडळींकडून सत्कार
वेंगुर्ले
उत्तराखंड ते महाराष्ट्रातील तब्बल ३५० गडकिल्ले सायकलवर स्वार होऊन पादाक्रांत करण्याचे स्वप्न बाळगणारे कु. रणवीर (कार्तिक) सिंग यांचा वेंगुर्ले येथे हिंदुधर्माभिमानी मंडळींच्या वतीने स्वागत व सत्कार करण्यात आला.
वेंगुर्ले येथील शिवछत्रपतींचा पुतळा, माणिकचौक समोर आयोजित कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बाबुराव खवणेकर सर यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. उपस्थितांनी त्यांच्या ध्येयवेड्या उपक्रमाचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कु. रणवीर (कार्तिक) सिंग यांनी ऐतिहासिक गडकिल्ल्यांच्या जतन व संवर्धनाबाबत जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने हा सायकल प्रवास करण्याचे स्वप्न व्यक्त केले आहे. त्यांच्या या प्रेरणादायी ध्येयामुळे युवकांमध्ये इतिहासाबद्दल अभिमान व जाणीव निर्माण होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
