You are currently viewing गाबीत समाज सिंधुदुर्गतर्फे नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा मालवणात शानदार सत्कार

गाबीत समाज सिंधुदुर्गतर्फे नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा मालवणात शानदार सत्कार

संस्कार हॉल येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत नगरसेवक, नगरसेविका व पंचायत समिती सदस्यांचा गौरव

मालवण :

गाबीत समाज सिंधुदुर्गतर्फे मालवण येथील संस्कार हॉल येथे नुकताच नवनिर्वाचित गाबीत समाजातील नगरसेवक, नगरसेविका व पंचायत समिती सदस्यांचा शानदार सत्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला.

या कार्यक्रमाला अखिल भारतीय गाबीत समाज महासंघाचे अध्यक्ष श्री. परशुराम उपरकर, कार्याध्यक्ष श्री. रतनकुमार झाजम, गाबीत समाज सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष श्री. चंद्रशेखर उपरकर, कार्याध्यक्ष श्री. हरिश्चंद्र खोबरेकर, सरचिटणीस श्री. महेंद्र पराडकर उपस्थित होते.

तसेच श्री. मच्छिमार फेडेरेशचे अध्यक्ष श्री. मेघनाथ धुरी, श्रमजीवी रापण संघांचे अध्यक्ष श्री. दिलीप घारे, महाराष्ट्र राज्य मच्छिमार कृती समितीचे जिल्हाध्यक्ष श्री. मिथुन मालंडकर, पारंपरिक मच्छीमार संघटनेचे नेते श्री. बाबी जोगी, वेंगुर्ला मच्छिमार नेते श्री. वसंत तांडेल, शिरोडा विभागाचे श्री. बाबा नाईक, श्री. लक्ष्मीकांत खोबरेकर उपस्थित होते.

यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक श्री. सुदेश आचरेकर, श्री. सहदेव बापर्डेकर, श्री. महेश कोयंडे, सौ. अनवेषा आचरेकर, सौ. मेघा गांवकर तसेच पंचायत समिती सदस्य सौ. प्रियांका घाटवळ, सौ. ज्योती तोरस्कर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

देवगडचे सरचिटणीस श्री. लक्ष्मण तारी, उपाध्यक्ष श्री. रमेश तारी, गाबीत समाज कार्यकर्ते श्री. पवनकुमार पराडकर, केरकर बंधू, श्री. अतुल मालंडकर, सौ. दिक्षा ढोके, सौ. पूजा सरकारे, सौ. राधिका कुबल, व्यसनमुक्ती मंचचे श्री. आबा शेलटकर, जेष्ठ नेते श्री. विलास ताम्हणकर, श्री. संजय केळुस्कर व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या तसेच समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा