*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी गीतकार गायक संगीतकार श्री अरुणजी गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*
*“वन स्नान”*
वनात जाऊन माणसाने करावे वनस्नान
निसर्गाचे संवर्धन करावे अभयारण्याचे रक्षणIIधृII
निसर्ग फुलवितो जैव विविधता छान
पंचेंद्रियाना निसर्गाबरोबर जोडावे नातं
नैसर्गिक वातावरणात उपचार उपयुक्तII1II
पंचेंद्रियाच्या क्षमता वापरव्या पूर्णतः
वनांतील पशुपक्षी कीटकांचे ऐकावे आवाज
स्पर्शाने माती झाडे पाने फुले घ्यावे जाणूनII2II
जंगलातील हिरवाई निरखावी डोळ्यानं
मुखावाटे शुद्ध हवा श्वासाने घ्यावी ओढून
सचैल करावे मनस्नान घ्यावे वनभोजनII3II
सुगंधाने तणाव शमतो वाटतो आल्हाद
वनस्नाने रोगप्रतिकार शक्ती होते निर्माण
मोकळ्या वातावरणात वाटते शांत प्रसन्नII4II
मानसिक आरोग्य राहते संप्रेरक संतुलित
हृदयाची गती संथ होते रक्ताभिसरण
तुकोबा सांगती वृक्षवल्ली आम्हा सोयरे होतII5II
©️कवी.श्री अरुण गांगल.रायगड कर्जत महाराष्ट्र
पिन.410201.Cell.9373811677.
