You are currently viewing संत गाडगेबाबा 

संत गाडगेबाबा 

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री पल्लवी उमरे लिखित संत गाडगेबाबा जयंती निमित्त अप्रतिम अभंगरचना*

 

# संत गाडगेबाबा 

 

थोर राष्ट्रसंत / ‌डेबूजी ते नाम

स्वच्छ करी ग्राम / जनसेवा /

 

हातात खराटा / मुखात गोपाला

गजर तो केला / किर्तनाचा /

 

अनिष्ट रुढींचे / करी निर्मुलन

केले प्रबोधन / जनहिता /

 

गावांचा विकास / शिक्षण प्रचार

ज्ञानाचा प्रसार / गावोगावी /

 

गोरगरिबांना / देऊन आधार

केलास उद्धार / अपंगांचा / ‌

 

ज्ञानाचीच गंगा / किर्तनात वाहे

देव शोधू पाहे / दुबळ्यात /

 

बांधी धर्मशाळा / ‌प्रजाहितासाठी

कुष्ठरोग्यांसाठी / सेवाव्रत /

 

जाती, पंथ ,भेद / करूनीया नष्ट

सारिले अनिष्ट / ‌‌ वर्णभेद /

 

संत शिरोमणी / विदर्भ भूषण

डेबूजी महान / ‌ कर्मयोगी /

 

पल्लवी उमरे मुंबई ✍️

प्रतिक्रिया व्यक्त करा