*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*कां …असं होतं आहे ..अजूनही..!!*
मैत्रीचा स्पर्श देत असला जरी
माझा हात थरथरतोय
तुझ्याकडे येतांनाही
पाय माझा..अडखळतोय ..!
निळ्या पदरात दडलेला
तुझा हिरव्या चुड्याचा हात रंगीत तांदूळ तुझ्यावर फेकायला
का मागे ओढतो ..माझाच हात
अगं जीवाभावाची
मैत्रीण तू माझी
मग कां ..असं होतं
तू तर.. सखी माझी ..!
तू आहेस जरी जवळच
तरी तू मला सोडून जात आहे
मैत्री आपली पवित्र सुंदर
मग का गं…असं होतं आहे
अजूनही शाळेच्या बाकावर
तू आजही..माझी वाट पाहत आहे
अगं..शाळा आपली कधीच सुटली
शेवटची घंटा अनेक वर्षांपूर्वीच वाजली
तरीही वाट पहात..शाळेच्या बाकावर तू अजूनही जशीच्या तशीच बसली..
आता तूच सांग…दरवळणारी ही कथा
कुणा कशी सांगावी…
बाबा ठाकूर
