You are currently viewing स्वरोपासना ग्लोबल म्युझिक अकॅडमी निर्मित ‘घरोघरी हवाच शिवबा’ गीताचे लोकार्पण

स्वरोपासना ग्लोबल म्युझिक अकॅडमी निर्मित ‘घरोघरी हवाच शिवबा’ गीताचे लोकार्पण

*स्वरोपासना ग्लोबल म्युझिक अकॅडमी निर्मित ‘घरोघरी हवाच शिवबा’ गीताचे लोकार्पण*

पिंपरी

वाकड आणि पुनावळे येथील स्वरोपासना ग्लोबल म्युझिक अकॅडमी आणि गीतफुलोरा निर्मित ‘घरोघरी हवाच शिवबा’ गाण्याचे लोकार्पण नुकतेच शिवजयंतीच्या निमित्ताने विक्रम कुलकर्णी, सुगंधा शिरवळकर, आनंद दीक्षित, राहुल वाळंके, सचिन बोर्डे, पूनम पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती करण्यात आले.

“दान मागते आयाबायांनो
देशासाठी पुन्हा एकदा…
घरोघरी हवाच शिवबा पुन्हा नव्याने पुन्हा एकदा…”

असे बोल असलेल्या या गीताला अभयार्पिता यांनी संगीतबद्ध केलेले असून अथर्व यांनी संगीत संयोजन तसेच अर्पिता आणि भाग्यदा यांनी त्याचे गायन केले आहे. गीतकार श्याम खांबेकर यांची ही रचना वाकड येथील वेस्टर्न एवेन्यू सोसायटीच्या शिवजयंती उत्सव सोहळ्यात दिमाखदारपणे सादर करण्यात आली. त्यामध्ये स्वरोपासना ग्लोबल म्युझिक अकॅडमीचे विद्यार्थी ओंकार, योगेंद्र, कृतिका, श्रिया, मिताली, अमेय, आरती, कल्पा, पुष्पलता, मीनल, ऋतुजा, वैष्णवी यांनी सहगायन केले. त्यावेळी सर्व उपस्थित शिवप्रेमींनी भरभरून दाद दिली.

गीत लोकार्पण सोहळ्यासाठी वेस्टर्न एवेन्यू सोसायटीतील सुशील घारे ,संतोष मोरे, नवनाथ पवार, सुधाकर दिवाण, सुमित काळे यांनी सहकार्य केले. “घरोघरी हवाच शिवबा…” हे गीत गीतफुलोरा (geetfulora) या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध असून सर्वांनी हे शिवगीत जरूर ऐकावे, असे आवाहन संगीतकार – गायक अभयार्पिता यांनी याप्रसंगी केले.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

प्रतिक्रिया व्यक्त करा