ओला,सुका हा कचरा,विलगीकरण करू या!
पिंपरी चिंचवड शहराला देशात नंबर वन करुया .
पथनाट्याद्धारे,माहिती देऊन जनजागृती.
पिंपरी चिंचवड
पालिका आरोग्य विभाग आणि मानवी हक्क संरक्षण आणि जागृती वतीने समतानगर व गणेशनगर येथे जिवनात स्वच्छ्तेत ईश्वर दडलेला असतो .स्वच्छतेचे महत्व सांगुण कचऱ्याच्या घंटा गाडीसमोर महिला कचरा टाकतांना जनजागृती करण्यात आली.
ओला,सुका हा कचरा,
विलगीकरणं करू या!
पिंपरी चिंचवडला शहराला,
देशात नंबर वन करू या! असे म्हणत पथनाट्य व माहिती देऊन सुरुवात केला.
अण्णा जोगदंड म्हणाले.5 प्रकारात कचऱ्याचे वर्गीकरण करावे
1)ओला कचराः शिळे अन्न, खरकटे,फळांची व भाज्यांची साले,चहा पावडर,मासे, मांस, हाडे, अंड्यांची टरफले,पालापाचोळा,नारळाच्या करवंट्या,नासलेले अन्नपदार्थ.२) सुका कचराःकागद, पुस्तके, पुठ्ठा,फुटके भांडे, कप-बश्या,रबर, टायर,लाकडाचे तुकडे.३) घातक कचराः बॅटरी सेल,औषधांच्या रिकाम्या बाटल्या,बल्ब, ट्यूबलाईट,रंगाचे डबे,जंतुनाशके व केमिकल स्प्रे,डिओड्रंट/क्लिनरच्या बाटल्या.४) सॅनिटरी कचराः वापरलेले डायपर,सॅनिटरी नॅपकिन्स,जखमेवरील पट्ट्या,घरगुती सिरिंज.५) प्लास्टिक कचराः प्लास्टिक बाटल्या (पाणी/सॉफ्ट ड्रिंक),दूध व तेलाच्या पिशव्या,कॅरी बॅग्स,प्लास्टिक कप, स्ट्रॉ, चमचे,मुलांची प्लास्टिक खेळणी अशा प्रकारे कचऱ्याचे वर्गीकरण करावे.
जोगदंड म्हणाले कि,”प्लास्टिकच्या कचऱ्याला लावू नका काडी, घरी येईल घंटागाडी” वर्गीकरण केलेला कचरा स्वतंत्र घंटागाडीतील सेवकांच्या हातात द्यावे. त्याच कचऱ्याच्या गाडीवर एक महिला सफाई कामगार असते त्यांच्या आरोग्याचा विचार करावा. शरीराच्या स्वच्छतेबरोबर माणसाच्या मनाची स्वच्छता होणे गरजेचे आहे.स्वच्छ्तेत ईश्वर दडलेला असतो हे प्रबोधन करण्यात आले.
पालिकेचे सहाय्यक आरोग्य अधिकारी शांताराम माने म्हणाले की नुकतेच महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण हवा बदल विभागाच्या वतीने *माझी वसुंधरा *अभियान राबविण्यात आले होते यामध्ये पालिकेने सहभाग नोंदवला आणि पालिकेने पर्यावरण संरक्षण ,कचरा व्यवस्थापन, जलसंवर्धन, ऊर्जा बचत यामध्ये प्रभावी जनजागृती केली आणि याचे फलित म्हणून आपल्या पालिकेला राज्यात पहिला क्रमांक मिळाला आहे हे सर्व श्रेय पालिकेचे आधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी केलेल्या सहकार्याचे फलित आहे असे माने म्हणाले.
आरोग्य निरीक्षक स्नेहल सोनवणे म्हणाल्या कि घातक कचरा, सुका, ओला कचरा वेगळा करून पालिकेला सहकार्य करावे काही नागरी समस्या असतील तर जरूर सांगावे.”आम्ही सर्वजन मदत करण्यास तयार आहोत.
500 वर्षे नष्ट न होणाऱ्या प्लास्टिकचा वापर न करण्याचे व शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
सा.का शिवानंद तालीकोटी यांनी घंटागाडीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे भरभरून कौतुक केले.
यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सहाय्यक आरोग्य अधिकारी शांताराम माने ,आरोग्य निरीक्षक स्नेहल सोनवणे, मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगीता जोगदंड,उपाध्यक्ष काळूराम लांडगे राजगुरुनगर अध्यक्ष शंकर नानेकर,ज्ञानेश्वर पवनकुमार रंधे, सा.का. शिवानंद कालीकोटी अरविंद मांगले ,प्रताप देवडकर,वसंत चकटे,दिपा खराडे आरोग्य मुकादम राजाराम राखपसारे ,अरुण जगताप बेसिक्स झोनल प्रमुख धिरज फणसे,बेसिक्स वॉर्ड इचार्ज सुनिल धावारे पूजा जाधव, आशा गायकवाड, अलकाताई लोंढे,प्रीती कोरी,अंकुश कांबळे, रोहित सुरवसे, सागर देवकर, गणेश तारडे, साहेब सूर्यवंशी, सुनील गोहिरात, वसंत चकटे,सुनील नरसिंगेअनेक स्थानिक नागरिक उपस्थित होते.
उपस्थित नागरिक व महिलांना पुजा जाधव यांनी स्वच्छतेची शपथ दिली.अण्णा जोगदंड यांनी उपस्थितांचे सर्वांचे आभार मानले.
