You are currently viewing कुडाळ येथे श्री संत गाडगे महाराज यांची १५० वी जयंती उत्साहात साजरी होणार

कुडाळ येथे श्री संत गाडगे महाराज यांची १५० वी जयंती उत्साहात साजरी होणार

कुडाळ येथे श्री संत गाडगे महाराज यांची १५० वी जयंती उत्साहात साजरी होणार

कुडाळ :

संत गाडगे महाराज यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त श्री संत गाडगे महाराज परिट समाज सेवा संघ, कुडाळ यांच्या वतीने सोमवार दिनांक २३ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत भव्य जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम कुडाळ येथील श्री सिद्धीविनायक मंगल कार्यालय येथे संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमास मान. श्री. शांताराम भाऊ कदम, अध्यक्ष, कोकण प्रदेश परिट (धोबी) सेवा मंडळ तसेच मान. श्री. नंदकुमार राक्षे, खजिनदार, कोकण प्रदेश परिट (धोबी) सेवा मंडळ यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मान. श्री. दिलीपजी भालेकर, जिल्हाध्यक्ष, श्री संत गाडगे महाराज परिट समाज सेवा संघ, सिंधुदुर्ग हे असणार आहेत.
जयंतीनिमित्त आरोग्य शिबिर तसेच विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून जिल्ह्यातील परिट समाजातील सर्व ज्ञातीबंधूंनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संघाचे अध्यक्ष श्री. सदानंद अणावकर यांनी केले आहे.
या जयंती उत्सवाच्या निमित्ताने सामाजिक ऐक्य आणि समाजप्रबोधनाचा संदेश देण्याचा संकल्प संघटनेने व्यक्त केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा