You are currently viewing श्री स्वामी समर्थ काव्यवंदना काव्यपुष्प – ६३ वे

श्री स्वामी समर्थ काव्यवंदना काव्यपुष्प – ६३ वे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी अरुण वि देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

श्री स्वामी समर्थ काव्यवंदना काव्यपुष्प – ६३ वे

*श्री स्वामी भ्रमणगाथा..*(पंढरपूर)

******

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ।।

।।श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ।।

_________________________

वर्ष -१८५३, शके- १७७५ या साली

संचारेश्वर स्वामींची स्वारी फिरत आली

पंढरपूरजवळ भीमानदीच्या ऐलतीरी

दर्शनासाठी स्वामींना जायचे पैलतीरी ।।

 

ते भर पावसाळी दिवस होते

महापुराचे पाणी दिसत होते

जायचे कसे आता पैलतीरी ?

कोडे पडले स्वामींना यावेळी ।।

 

नावाडयाला स्वामीं म्हणाले

पैलतीरी आम्हास सोडावे

नावाडी बोले दोन रुपये द्यावे

मगच या नावेत येऊन बसावे ।।

 

अरे, आम्ही संन्यासी,स्वामी बोले

दोन रुपये तुजला कुठून द्यावे,

इतरांच्या सोबत रे तू आम्हाला

पलीकडे नेऊन सोडावे ।।

 

स्वामींचे सांगणे, त्याने नाही ऐकले

स्वामींना सोडून इतरांना नेऊन सोडले

येतांना पलीकडच्याना ही आणले

पण,स्वामींना नावेतून नाही सोडले ।।

_________________________

करी क्रमशः हे लेखन कवी अरुणदास

___________________________

कवी अरुणदास ” अरुण वि.देशपांडे- पुणे.

___________________________

प्रतिक्रिया व्यक्त करा