You are currently viewing राजे…

राजे…

  • Post category:इतर
  • Post comments:0 Comments

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*राजे…*

 

राजे

आपला महिमा

कसा वर्णावा शब्दात

तेजाने तळपते दैदिप्यमान प्रतिमा

 

राजे

जिजाऊंनी दिले

विचार आणि संस्कार

मूर्तीमंत तेज त्यातून फाकले!!

 

राजे

बालवयात पराक्रम

स्वराज्याची घेतली शपथ

गडकिल्ले बांधून सार्थ उपक्रम!!

 

राजे

राज्य रयतेचे

ब्रीद जपले प्राणपणे

ह्रदयसिंहासनी विराजमान प्राणप्रिय जनांचे!!

 

राजे

काळीज आपले

कधी कठोर प्रेमळ

स्वप्न स्वराज्याचे दिनरात्र जपले

 

राजे

प्रजाहितदक्ष नित्य

समर्पित आयुष्य आपले

झुंजार मावळ्यांसह युध्दात समर्थ!!

 

राजे

आपला जयजयकार

चंद्र सूर्य असेतोवर

स्विकारा मानाचा मुजरा त्रिवार!!

 

✨✨✨✨✨✨✨✨

अरुणा दुद्दलवार@✍️

प्रतिक्रिया व्यक्त करा